Is Rice Good For Health : दररोज भात खाणे शरीरासाठी चांगले आहे का?

कोमल दामुद्रे

भात

पोळीपेक्षा भात खाणे बहुतांश भारतीयांना आवडते. काही लोकांना दररोज वरण-भात-तूप खायला आवडतं.

महत्त्व

अशा परिस्थितीत रोज भात खाल्ल्याने आपल्या शरीरावर कोणते परिणाम होतात आणि आपण रोज भात खावे की नाही हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

वजन नियंत्रणात

भातामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. यामध्ये संपूर्ण धान्याचे सर्व गुणधर्म आहेत जे तुमच्या शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

कोलेस्ट्रॉल

प्रत्येक दिवशी मर्यादित प्रमाणात भाताचे सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

जास्त भात खाऊ नका

असे म्हटले जाते की जास्त भात खाल्ल्याने तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका होऊ शकतो. अशा परिस्थितीत रोज भात खाताना त्याच्या प्रमाणाकडेही लक्ष दिले पाहिजे.

पचनशक्ती

भातात फायबर अधिक असते. जे खराब पचनास मदत करते आणि आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवते. भात हे हलके अन्न आहे जो सहज पचतो.

ऊर्जा

तांदूळ पचण्यास हलका असल्यामुळे शरीरात त्वरीत ऊर्जा निर्माण करते. यामुळे तांदळाला ऊर्जेचा सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते.

अशक्तपणापासून संरक्षण

तांदळात लोह आणि तांबे सारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे रक्तातील ऑक्सिजन आणि लाल रक्तपेशींना चालना देण्यासाठी उपयुक्त असतात. अशावेळी ते अॅनिमियापासून बचाव करण्यास मदत करते.

चांगली प्रतिकारशक्ती

ब्राऊन राइसमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. अशा परिस्थितीत तांदळाच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Next : पिकनिक स्पॉट शोधताय? ते ही ठाण्यात; ही १० पर्यटनस्थळे आहेत उत्तम पर्याय...

Thane Picnic Spots | Saam Tv
येथे क्लिक करा