आयकर रिटर्न फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. हा फॉर्म वेळेत भरला नाही तर आपल्याला योग्य तो दंड भरावा लागणार आहे. टॅक्स रिटर्न फॉर्म कोणत्या व्यक्तीने भरावा? ती भरण्याची योग्य वेळ कोणती?
नोकरदार आणि अविवाहितांना ITR-1 अंतर्गत त्यांचा ITR दाखल करण्यास अनुमती देते. याला आयकर विभागाने सर्वात सोपा फॉर्म देखील म्हटले आहे. यामध्ये इतर फॉर्मच्या तुलनेत जास्त माहिती भरण्याची गरज नाही. तसेत सगळेच नोकरदारवर्ग हा फॉर्म भरु शकत नाही.
2022-23 या आर्थिक वर्षात एखाद्याने काही व्यवहार केले असतील तर तो ITR-1 साठी अपात्र ठरू शकतो. आयटीआर (ITR)-१ हा फॉर्म भरुन कोण आयकर रिटर्न भरू शकतो याविषयी जाणून घेऊया
भारताचा (India) रहिवासी असून ती व्यक्ती ITR-1 फॉर्म भरण्यास पात्र ठरु शकतो. त्याचे उत्पन्न 2022-23 या आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. पगार, पेन्शन आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनातून त्याचे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. घरातील मालमत्तेचे उत्पन्न आणि कृषी उत्पन्न (Salary) रु.5000 पर्यंत असायला हवे. याशिवाय पोस्ट ऑफिसचे उत्पन्न, व्याज, उत्पन्न आणि लाभांश असलेल्या व्यक्ती ITR-1 फॉर्म भरू शकतात.
जर एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंड, सोने, इक्विटी शेअर्स, हाऊस प्रॉपर्टी आणि इतर स्त्रोतांमधून उत्पन्न मिळवले तर तो ITR-1 भरू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीने सट्टा मालमत्ता किंवा घोड्यांच्या शर्यती, लॉटरी, कायदेशीर जुगार किंवा इतर सेवांमधून कमाई केली असेल, तर ते ITR-1 दाखल करण्यास देखील पात्र नाहीत.
एखाद्या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून उत्पन्न असल्यास, तो ITR-1 दाखल करू शकत नाही. याशिवाय या देशातील अनिवासी भारतीय देखील ITR-1 दाखल करण्यास अपात्र आहेत. तसेच, बँकेतून पैसे काढताना तुमच्यावर 194N नुसार TDS आकारला गेला असेल, तर तुम्ही ITR-1 फॉर्म वापरण्यासही अपात्र असाल.
जर कोणी चुकून ITR 1 फाईल केले तर आयकर विभागाकडून नोटीस देखील येऊ शकते. आयटीआर नोटीसच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत ते दाखल करणे आवश्यक आहे. असे न केल्यास, तुम्ही भरलेला हा आयटीआर अवैध मानला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.