Oil Free Breakfast Saam TV
लाईफस्टाईल

Oil Free Breakfast : एक थेंब सुद्धा तेलाचा वापर न करता बनवा सकाळचा नाश्ता; आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे

Oil Free Morning Breakfast: वजन वाढणे, बीपी, शुगर, कॉलेस्ट्रॉल या समस्या आहारात असलेल्या तेलामुळे होतात. तेलाचे प्रमाण जास्त झाले की आपल्याला विविध आजार जडतात.

Ruchika Jadhav

सध्या प्रत्येक व्यक्ती काही ना काही आजाराने त्रस्त आहेत. आरोग्य सुदृढ आणि निरोगी रहावं यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही टिप्स फॉलो करत असतात. वजन वाढणे, बीपी, शुगर, कॉलेस्ट्रॉल या समस्या आहारात असलेल्या तेलामुळे होतात. तेलाचे प्रमाण जास्त झाले की आपल्याला विविध आजार जडतात.

त्यामुळे अनेक व्यक्ती फॅट आणि ऑईल फ्री पदार्थ खाणे पसंत करतात. त्यामुळे आज सकाळी ऑफिसच्या वेळेत झटपट असाच ऑईल फ्री नाश्ता कसा बनवायचा याची माहिती पाहणार आहोत.

ओट्स किंवा रवा उपमा

ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वता आधी पॅनमध्ये थोडं जिरे भाजून घ्या. जिरे थोडे भाजत आले की त्यात कांदा टाका. कांदा छान शिजावा यासाठी त्यामध्ये पाणी टाकून घ्या. पाण्याला उकळी आली की तुमच्या आवडीचे मसाले आणि भाज्या टाका. सर्व शिजल्यावर त्यात ओट्स टाकून एक फाव काढून घ्या. तयार झाले ओट्स. अशाच पद्धतीने तुम्ही रवा उपमा सुद्धा बनवू शकता.

कॉर्न पनीर सलाड

वजन कमी करणे यासह हृदय निरोगी ठेवण्यासाठी सलाड फायदेशीर आहे. त्यासाठी आधी पनीरचे तुकडे एका नॉनस्टिक पॅनमध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर कॉर्न कुकरल शिजवून घ्या. तुम्ही यामध्ये शेंगदाणे रात्री भिजत ठेवून सकाळी ते मिठाच्या पाण्यात शिजवू शकता. हे सर्व मिश्रण एकत्र करा आणि त्यावर चाट मसाला, मिरी पूड टाकून मस्त ताव मारा.

आलू पराठा

बटाटे आधी शिजवून घा. त्यानंतर यामध्ये हळद, मीठ, मीरची आणि जिरे, मोहरी मिक्स करा. नंतर चपातीचे पीठ मळून त्यात बटाट्याच्या भाजीचे मिश्रण भरून घ्या. तसेच गॅसवर भाजून घ्या. तयार झाला आलू पराठा.

या तिन्ही रेसिपी फार सोप्प्या आणि झटपट तयार होणाऱ्या आहेत. याने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील मोठी मदत होते.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजन कसं करायचं? जाणून घ्या A टू Z साहित्यादी संपूर्ण यादी

Railway jobs : ग्रॅज्युएशन झालंय? रेल्वेत करा नोकरी, ५८०० जागांसाठी निघाली मेगा भरती, वाचा A टू Z माहिती

Skin Care: ड्राय स्किनला करा Bye Bye! या ‘मॅजिक ऑईल्स’नी चेहरा होईल सॉफ्ट आणि ग्लोइंग

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Krantijyoti Vidyalay: नवीन वर्षात भरणार मराठी शाळा; 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' नूतनवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT