आजकाल फक्त स्त्रियाच नाही तर, पुरूषही केस गळतीमुळे त्रस्त आहेत. केस गळती थांबवण्यासाठी अनेक प्रकारचे केमिकलयुक्त शॅम्पू वापरले जातात पण त्यांचा काहीही उपयोग होत नाही. खरंतर शरिरातील कोणत्याही समस्येशी लढण्यासाठी शरिराला आतून पोषण मिळणे आवश्यक आहे. यासाठी केसांच्या आरोग्यास उपयुक्त असलेले पोषण आणि विटॅमिन्सयुक्त पदार्थांनी बनलेले लाडू रामबाण उपाय ठरू शकतात.
हे पौष्टिक लाडू काळे तिळ, भोपळ्याच्या बिया, अखरोड, आवळा यांसारख्या पोषणयुक्त पदार्थांनी बनवले जातात. यामध्ये मोठ्याप्रमाणात बायोटिन, झिंक, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि आयर्न असते. यामुळे केसांना मजबुती मिळते आणि केस गळती कमी होते. तसेच काळे आणि घनदाट केस मिळवता येतात. हा एक लाडू रोज खाल्ल्याने शरिराला भरपूर प्रमाणात पोषण मिळवून देतो. रोगप्रतिकार शक्ती वाढते एवढेच काय तर, हृदयाचे आरोग्यही सुधारते. शिवाय व्हायरल इन्फेक्शनवरही उपयुक्त ठरतो.
हा लाडू बनवण्यासाठी पुढिल साहित्य आवश्यक आहे :
१. काळे तिळ
२. भोपळ्याच्या बिया
३. अखरोट
४. मोरिंगा पावडर
५. आवळा पावडर
६. बिया काढलेले खजूर
लाडू कसा बनवाल ?
१. काळे तिळ, अखरोट, भोपळ्याच्या बिया मंद आचेवर भाजून घ्या.
२. थंड झाल्यावर मिक्सरच्या मदतीने बारिक वाटून घ्या.
३. त्यात गरजेनुसार मोरिंगा पावडर, आवळा पावडर आणि खजूर घालून मिश्रण पुन्हा वाटून घ्या.
४. हाताला तूप लावून हलक्या हाताने लाडू तयार करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.