Blood test heart 
लाईफस्टाईल

आता एक ब्लड टेस्ट 30 वर्ष आधीच सांगणार महिलांमधील हृदयाच्या आजारांचा धोका, वाचा संशोधनात नेमकं काय काय समोर आलं?

हृदयाच्या समस्या जाणून घेण्यासाठी डॉक्टर आपल्याला विविध टेस्ट करण्याचा सल्ला देतात. मात्र तज्ज्ञांनी एक संशोधन केलं असून यामध्ये एका सामान्य ब्लड टेस्टच्या माध्यमातून महिलांमध्ये हृदयाच्या आजारांचा धोका समजू शकतो.

Surabhi Jagdish

हृदयाच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. केवळ पुरुष नाही तर महिलांमध्ये हृदयाच्या आजारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येतंय. पण तुम्हाला माहितीये का, एका सामान्य ब्लड टेस्टच्या माध्यमातून हृदयविकारांच्या धोक्यांबाबत माहिती मिळू शकते.

अमेरिकेतील नॅशंनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनात असं आढळून आलंय की, रक्तातील दोन प्रकारचे फॅट्स मोजण्यासोबत मार्कर C-reactive प्रोटीनद्वारे एखाद्या महिलेला १० वर्षांनंतर हृदयविकाराचा धोका असल्याचा धोकाही दर्शवण्यास मदत होते. बोस्टनच्या ब्रिघम एंड विमेन्स रुग्णालयातील हृदयरोग प्रतिबंधक केंद्राचे संचालक पॉल एम रिडकर यांनी सांगितलं की, जी गोष्टीचं मापन आपण करू शकत नाही त्यावर उपचार करणं शक्य नाही. आम्हाला आशा आहे की, हे निष्कर्ष आम्हाला हृदयाच्या समस्याचं निदान करण्यात आणि त्यावर प्रतिबंध घालण्यास मदत करतील."

नेमकं काय आहे हे संशोधन?

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, तज्ज्ञांच्या टीमने अमेरिकेत राहणाऱ्या २७,९३९ हेल्थकेअर प्रोवायडर्सकडून रक्ताचे नमुने आणि वैद्यकीय माहिती घेण्यात आली. यामध्ये केवळ महिलांनी सहभाग घेतला होता.

या संशोधनादरम्यान ५५ वयोगाटील महिलांच्या आरोग्याचं जवळपास ३० वर्ष परीक्षण करण्यात आले. यावेळी सहभागी झालेल्या ३६६२ महिलांचा हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांच्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं.

संशोधकांनी high sensitivity CRP, लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल आणि लिपोप्रोटीन(ए) – LDL ने बनलेला एक लिपिड या घटनांचा एकट्याने किंवा एकत्रितपणे अंदाज बांधण्यासाठी कसा कारणीभूत ठरतो याचं परीक्षण केलं. जेव्हा तिन्ही मापांचं एकत्रित मूल्यमापन केलं तेव्हा उच्च पातळी असलेल्या सहभागींना स्ट्रोकचा धोका 1.5-पटींहून अधिक आणि हृदयाच्या आजारांचा धोका 3-पटींहून अधिक वाढला असल्याचं दिसून आलं.

संशोधनात केवळ महिलांचा समावेश

या संशोधनात केवळ महिलाच्यां आरोग्याची माहिती घेण्यात आली. मात्र तरीही पुरुषांमध्येही असेच परिणाम मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी यावेळी तज्ज्ञांनी शारीरिक हालचाल, हृदयासाठी आरोग्यदायी असा आहार, तणावाचं योग्य व्यवस्थापन त्याचप्रमाणे तंबाखूचं सेवन टाळणं या गोष्टींचं पालन केलं पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT