Plastic Bottle Germs :​ प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिणे हानिकारक; गंभीर आजार टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं वाचाच

side effects of drinking water in plastic bottles :​ प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिणे आरोग्यास हानीकारक आहे. गंभीर आजार टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं जाणून घ्या.
प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिणे हानीकारक; गंभीर आजार टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं वाचाच
Plastic Water Bottle Side EffectsSaam Tv
Published On

विशाल गांगुर्डे/ डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : आता घरात असो प्रवासात अनेकांना प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिण्याची सवय लागली आहे. दररोज नोकरीला जाणाऱ्या लोकांच्या बॅगेतही तुम्हाला प्लास्टिकची पाण्याची बॉटल आढळते. मात्र, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे जिवावर बेतू शकते. सातत्याने प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी प्यायल्याने गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकतं. या गंभीर धोक्याविषयी आरोग्य तज्ज्ञ डॉ. पांडुरंग वट्टमवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

आरोग्यास हानीकारक

प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे आरोग्यास हानीकारक आहे. प्लास्टिकच्या बॉटलमधी पाणी प्यायल्याने महिलांनाही स्तनाच्या कर्करोगासारखा गंभीर आजाराचा सामना करू शकतो. या दररोजच्या सवयीमुळे व्यक्तीला कॅन्सर, मधुमेह, हृदय रोगासारखे गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लोकांनी सावध राहण्याचा सल्ला डॉ. पांडुरंग वट्टमवार यांनी दिला आहे.

प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिणे हानीकारक; गंभीर आजार टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं वाचाच
Health Tips: तुम्हालाही खूप जास्त झोप येते? ही असू शकतात कारणं

मेंदूवर होतो गंभीर परिणाम

न्युरॉलॉजिस्ट डॉ. पांडुरंग वट्टमवार म्हणाले, 'शरीरातील बहुतेक व्यक्तींच्या अवयवांमध्ये उदाहरण. मूत्रपिंड, हृदय आणि यकृतात मायक्रो प्लास्टिक आढळलेले आहे. तसेच मेंदूत देखील आढळलेले आहेत. हे मायक्रो प्लास्टिक नेमकं कुठून येतात, तर आपण जे रोज प्लास्टिकचा वापर करतो. त्या प्लास्टिकच्या पाणी बॉटल, प्लास्टिकचे ग्लासमधून येतं. प्लास्टिक बॉटलमधील पाणी सातत्याने प्यायल्याने न्यानो पार्टिकल शरीरामध्ये जातात. ते शरीरात जाऊन रक्तवाहिन्यावर वेगवेगळ्या अवयवामध्ये जातात. तसंच मेंदूमध्ये देखील जातात'.

'मेंदूची काम करण्याची गती होते कमी'

'आता हे नॅनो प्लास्टिक किंवा नॅनो पार्टिकलचा फार दुष्परिणाम होतो. याच्यावरत संशोधन सुरु आहे. काही गोष्टी सिद्ध झालेल्या आहे आणि काही गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत. पण असा आढळून येतं की, या मायक्रो प्लास्टिकमुळे आपल्या मेंदूमधील काम करण्याची जशी रचना असते आणि मेंदूमध्ये ज्या काम करणाऱ्या पेशी असतात. त्यांची गती कमी होते. त्यामुळे सिग्नल मेंदूमधून बाकीच्या नसांमध्ये आणि अवयवांमध्ये पोहोचत नाही, असे त्यांनी सांगितले.

प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिणे हानीकारक; गंभीर आजार टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं वाचाच
Health Tips: आद्रकच्या चहाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

आजाराची लक्षणे काय?

प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी सतत प्यायल्याने गंभीर आजार जडतो. याची आजाराची लक्षणे ही अचानकपणे येत नाही. या आजारात फिट्स येते, झटका येतो, हातापायाची शक्ती कमी करून अर्धांगवायू येतो, अशी या आजाराची लक्षणे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com