Ashtavinayak Mandir : अष्टविनायकाचं दर्शन कधी घेतलंत का? महिमा जाणून घेण्यासाठी यंदा गणेशोत्सवात नक्की भेट द्या!

Ashtavinayak Mandir : हिंदू धर्मात कोणत्याही पूजेमध्ये सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. आज आम्ही तुम्हाला गणपतीच्या 8 प्रमुख मंदिरांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या दर्शनाला तुम्ही यंदाच्या गणेषोत्सवात जाऊ शकता.
Ashtavinayak Mandir
Ashtavinayak Mandir saam tv
Published On

गपणती येण्यासाठी आता अवघा एक आठवडा बाकी आहे. ७ सप्टेंबर रोजी अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होणार आहे. असं मानण्यात येतं की, गणपती महाराज आपल्या भक्तांना जीवनात सर्व सुख आणि समृद्धी देतात. हिंदू धर्मात कोणत्याही पूजेमध्ये सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते.

यंदाच्या गणपतीमध्ये तुम्ही अष्टविनायकाच्या दर्शनाला जाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला गणपतीच्या 8 प्रमुख मंदिरांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या दर्शनाला तुम्ही यंदाच्या गणेषोत्सवात जाऊ शकता. ज्या मंदिरांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्या मंदिरांमध्ये प्रत्येक मूर्ती स्वयंभू स्वरूपात आहे.

मयूरेश्वर मंदिर (मोरगांव)

हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील पुण्यापासून 80-81 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावमध्ये आहे. या ठिकाणी श्रीगणेशाने मोरावर बसलेल्या सिंधरासुर राक्षसाचा वध केला होता, असं मानलं जातं. त्यामुळे मंदिराचे नाव मयुरेश्वर पडले. या मंदिराला चार दरवाजे असून ते सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगाचे प्रतीक मानले जातात. मंदिरातील गणपतीची मूर्ती बसलेल्या स्थितीत असून त्याची सोंड डावीकडे आहे.

सिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक)

हे मंदिर अहमदनगरमध्ये असून ते सुमारे 200 वर्षे जुने असल्याची माहिती आहे. गणपतीचं हे मंदिर पर्वत शिखरांच्यामध्ये आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला असून भगवान विष्णूने सिद्धी प्राप्त केली होती अशी धारणा आहे. मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी डोंगरातून जावं लागतं.

बल्लालेश्वर मंदिर (पाली)-

हे मंदिर पाली गावात असून बल्लाळ या गणेशभक्ताला त्याच्या कुटुंबीयांनी गणपतीच्या मूर्तीसह जंगलात सोडलं होतं. बल्लाळला त्या वेळी जंगलातल्या गणपतीची आठवण झाली. भगवान गणेश आपल्या भक्ताचे दुःख पाहवलं नाही आणि त्यांनी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिलं. त्यामुळे या जागेला बल्लाळेश्वर मंदिर असं नाव पडलं.

वरविनायक मंदिर (महाड़)-

महाडमध्ये हे वरदविनायक मंदिर आहे. या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना वरविनायक गजानन वरदान देतात, अशी मान्यता आहे.

चिंतामणी मंदिर (थेऊर)-

याठिराणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि त्याचं मन शांत झालं होतं. थेऊर गावाजवळ मुळा, मुठा आणि भीमा या तीन नद्यांच्या संगमाच्या काठावर हे मंदिर आहे. तणावाग्रस्त किंवा चिंतेने त्रस्त असलेल्या कोणत्याही भक्ताने या ठिकाणी दर्शन घेतलं तर त्याच्या समस्या दूर होतात असं मानलं जातं.

Ashtavinayak Mandir
Mangal And Guru Yuti: १२ वर्षांनी होणार मंगळ-गुरुचा संयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार

गिरीजात्मज अष्टविनायक मंदिर (लेण्याद्री)

हे पवित्र स्थान भगवान गणेशाच्या प्रमुख आठ सिद्ध अष्टविनायकांपैकी एक असून लेण्याद्री गावात हे मंदिर आहे. हे मंदिर पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर आहे. लेण्याद्रीचा गणपती भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो, असं मानलं जातं.

विघ्नेश्वर अष्टविनायक मंदिर(ओझर)

हे मंदिर ओझरमध्ये पुण्यापासून सुमारे ८५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी विघ्नासूर नावाचा राक्षस होता, ज्याच्या दहशतीमुळे सर्वजण त्रस्त होते, याच ठिकाणी श्रीगणेशाने या राक्षसाचा वध करून सर्वाना मुक्त केलं असल्याची, पौराणिक कथा आहे. . म्हणून या स्थानाला विघ्नेश्वर असे नाव पडले, जो अडथळ्यांचा पराभव करणारा गणपती आहे.

महागणपती मंदिर(रांजणगाव)

रांजणगावातील हे मंदिर अष्टविनायक मंदिरांपैकी हे गणपतीचे सर्वात जुनं मंदिर आहे. या मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीला महोटक म्हणतात.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Ashtavinayak Mandir
Ganesh Chaturthi Prasad : फक्त ३ गोष्टींपासून बनवा खुसखुशीत आणि गोड बालुशाही; गणेशोत्सवात बनवा सिंपल स्विट रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com