गणपती बाप्पाचे आगमन होण्यासाठी आता केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. बाप्पा घरी येणार म्हणून सर्वत्र विविध मिठाईचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवात गणरायाला आवडणारे मोदक सर्वचजण खातात. उकडीचे आणि फ्राय केलेल्या मोदकांवर प्रत्येक व्यक्ती ताव मारतो. मात्र रोज मोदकाचा प्रसाद ठेवणे कठीण होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या गोड पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत.
गणेशोत्सवात रोज वेगळ्या मिठाईची चिंता असेल तर तुम्ही घरच्याघरी बालुशाही सुद्धा बनवू शकता. बालुशाही अगदी खुसखुशीत आणि गोड असते. तसेच ही मिठाई बनवण्यासाठी फारशी मेहनतही लागत नाही. कमी साहित्यात सुद्धा ही रेसिपी बनवून झटपट तयार होते. त्यामुळे आज बालुशाहीची सिंपल रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य
२५० ग्रॅम मैदा
१ चमचा बेकींग सोडा
२ चमचे मीठ
१ वाटी तूप
फूड कलर
साखर
पाणी
कृती
बालुशाही बनवणे फार सोप्प असलं तरी त्याचं प्रमाण योग्य ठेवा. प्रमाण चुकलं की बालुशाही बसते आणि चांगली बनत नाही. रेसिपी बनवताना सर्वात आधी २५० ग्रॅम मैदा घ्या. यामध्ये १ चमचा बेकींग सोडा मिक्स करून घ्या. मैदा घरात असलेला वापरा किंवा मग दुकानातून आणलेला वापरला तरी तो चाळणीने चाळून घ्या. यामध्ये चवीपुरते मीठ मिक्स करा आणि सर्व मिश्रण एकत्र करा.
पुढे या पिठात एक वाटी तूप टाकून घ्या. तुपात तुमच्या आवडीचा किंवा पिवळ्या रंगाचा फुड कलर मिक्स करा. त्यात साखर आणि पाणी सुद्धा मिक्स करून छान कनीक मळून घ्या. येथे तुम्हाला पिठी साखर घ्यायची आहे. त्यानंतर तयार पिठाचे बारीक गोळे करून घ्या. त्यानंतर दुसऱ्या गॅसवर तेल तापण्यासाठी ठेवा. तेल छान तापलं की एक एक बालुशाही यामध्ये टाकून तळून घ्या.
बालुशाही तळत असताना गॅल अगदी मंद ठेवा. कमी गॅसवरच तु्म्हाला सर्व बालुशाही तळून घ्यायच्या आहेत. बलुशाही तळत असताना त्या सतत चमच्याने उलट पालट करत राहा. बालुशाही बनत असतानाच दुसरीकडे एका गॅसवर पाक बनवण्यास सुरूवात करा. पाक बनवताना आधी साखर आणि पाणी मिक्स करून घ्या. तयार पाकात एक एक करून सर्व बालुशाही ठेवा. तयार झाला गणपतीसाठी एक स्पेशल प्रसाद मिठाई.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.