Kalaknad Recipe : दहीहंडी स्पेशल घरच्याघरी बनवा श्रीकृष्णाला आवडणारं कलाकंद; वाचा स्पेशल रेसिपी

Dahi Handi Special Kalakand Recipe: आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी दहीहंडी स्पेशल कलाकंद कसे बनवायचे याची माहिती सांगणार आहोत.
Kalaknad Recipe
Kalaknad RecipeSaam Tv
Published On

आज सर्वत्र दहीहंडी उत्सव जोरदार साजरा केला जात आहे. दहीहंडीनिमित्त बाळकृष्णाला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक घरांमध्ये बाळगोपाळासाठी कलाकंदचा नैवेद्य दाखवला जातो. काही व्यक्तींना परफेक्ट कलाकंद बनवता येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी दहीहंडी स्पेशल कलाकंद कसे बनवायचे याची माहिती सांगणार आहोत.

Kalaknad Recipe
Achari Paratha Recipe: घरच्या घरी सोप्या पद्धतीनं ट्राय करा आचारी पराठी

साहित्य

पनीर - २५० ग्रॅम

खवा - २०० ग्रॅम

दूध - १/२ कप

क्रीम - १/२ कप

साखर - १ कप

वेलची पावडर - १ चमचा

ड्राय फ्रूट्स - २ चमचे

तूप - १ चमचा

कृती

कलाकंद बनवणे फार सोप्प आहे. त्यासाठी सर्वात आधी पनीर आणि खवा एकत्र एका बाउलमध्ये मिक्स करून घ्या. हे मिश्रण तयार करण्यासाठी तुम्ही पनीर आणि खवा छान किसून सुद्धा घेउ शकता. कढईमध्ये मिडिअम फ्लेमवर हे मिश्रण एकत्र करत राहा. त्यानंतर यामध्ये दूध मिक्स करा. दूध टाकल्यावर मिश्रण पातळ होईल. त्याचवेळी यामध्ये क्रिम सुद्धा मिक्स करून घ्या. दूध आणि क्रिम घट्ट होत आली की यामध्ये साखर मिक्स करून घ्या.

साखर मिक्स करतानाच तुम्ही यात वेलची पावडर सुद्धा मिक्स करू शकता. वेलची पावडर आणि तूप सुद्धा यामध्ये टाकून एकजीव करत राहा. सर्व मिश्रण छान एकजीव झालं की गॅस बंद करा. त्यानंतर हे मिश्रण थंड करून घ्या. मिश्रण आपण स्पर्श करू शकू इतकं थंड झाल्यावर ते बाहेर काढून घ्या. त्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये हे मिश्रण पसरवून घ्या.

मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर सुरीने याचे बारीक काप करून घ्या. अशा पद्धतीने सिंपल ट्रिक वापरून तुमची टेस्टी कलाकंद रेसिपी तयार होईल. प्रसादामध्ये सुद्धा तु्म्ही सर्वांना कलाकंद देऊ शकता. बाळ श्रीकृष्णाला देखील हाच प्रसाद तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता.

Kalaknad Recipe
Leftover Roti Recipe : चटपटीत चव अन् खायला पौष्टिक, उरलेल्या चपातीपासून नाश्त्याला बनवा टेस्टी डीश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com