ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गव्हाचे पीठ, तूप, मीठ, ओवा, लोणचं,पाणी
सर्व प्रथम एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ, त्यामध्ये मीठ आणि तेल ताकून मिक्स करा.
त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या. पिठ थोड्यावेळ बाजूला ठेवा आणि गॅसवर तवा गरम होण्यास ठेवा.
त्यानंतर पीठाचे गोळे बनवून चपाती लाटून घ्या. चपाती थेडी जाडसर लाटा. त्यानंतर त्या चपातीवर लोणचं पसरवून त्यावर थोडा ओवा वसरवा.
त्यानंतर पुन्हा एकदा चपाती लाटून घ्या तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन पदरी पराठा देखील बनवू शकता.
त्यानंतर तयार पराठा तव्यांवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. पराठा पौष्टिक बनवण्यासाठी त्यावर तूप सोडा.
गरमागरम आचारी पराठा तुम्ही जेवताना किंवा दुपारच्या वेळी खाऊ शकता.