November Monthly Horoscope 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

November Monthly Horoscope 2023 : येत्या महिन्यात या राशींचे नशीब फळफळणार, दिवाळीत लागणार लॉटरी; तुमची रास यात आहे का?

November Horoscope 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात तीन मोठ्या ग्रहांचे देखील संक्रमण होणार आहे.

कोमल दामुद्रे

November Monthly Rashi bhavishya :

नोव्हेंबर महिन्यात अनेक महत्त्वाच्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात तीन मोठ्या ग्रहांचे देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक राशींवर त्यांचा प्रभाव पडणार आहे.

या महिन्यात शुक्र, शनि आणि बुध ग्रहाचे राशींमध्ये संक्रमण होत आहे. त्यामुळे अनेक राशींवर त्याचा शुभ आणि अशुभ फले प्राप्त होतील. या लोकांना करिअर, उत्पन्न संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तसेच दिवाळी मोठा सण या महिन्यात येत असल्यामुळे अनेक राशींना लॉटरी लागू शकते. जाणून घेऊया या महिन्याचे राशीफळ. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मेष

मेष राशीतील लोकांच्या नशीबात सुख येईल. कामाची व्याप्ती वाढेल. नोकरीच्या संधी मिळतील. वैवाहिक (Marriage) जीवनात गोडवा निर्माण होईल. आर्थिक (Money) संकंटाचा सामना करावा लागेल.

2. वृषभ

अनपेक्षित गोष्टी घडतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अधिक चांगला असेल. प्रेमसंबंधात दुरावा येईल. ग्रहांच्या संक्रमणामुळे या राशीवर विशेष परिणाम होईल.

3. मिथुन

कौटुंबिक कलह आणि मानसिक अशांततेचा (Mental Health) सामना करावा लागेल. मित्र-नातेवाईकांकडून काही गोष्टी कळतील. जमीन, मालमत्ता संबंधित प्रश्न सुटतील. घर आणि वाहने घ्यायची असतील तर हा काळ चांगला असेल.

4. कर्क

या महिन्यात काम करण्याची जिद्द संचारेल. कामाची नवीन योजना आखाल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील. कोर्टाची पायरी चढावी लागेल.

5. सिंह

या राशींसाठी हा महिना यशस्वी ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. दिवाळीचा बोनस भरभरुन मिळेल. कामात प्रगती होईल. नवीन व्यवसायात आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे.

6. कन्या

या महिन्यात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. जिद्दीच्या बळावर विजय मिळवेल. कामात यशस्वी व्हाल. कुटुंबात शुभ कार्य घडेल. नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे वातावरणात प्रसन्नता राहिल. वैवाहिक चर्चा यशस्वी होईल.

7. तुला

आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. प्रेमसंबंधात प्रगती होईल. सरकारी टेंडरसाठी अर्ज कराल. व्यवसायात प्रगती होईल. लवकरच लग्न होऊ शकते.

8. वृश्चिक

महिनाभरात यश चांगले मिळेल. आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल. वैयक्तित जीवनात प्रगती होईल. मतभेदांना सामोरे जावे लागेल. वादविवाद टाळा. स्पर्धांमध्ये अधिक चांगले यश मिळेल.

9. धनु

या महिन्यात यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. परदेशात प्रवास होतील. नवीन काम करण्याची संधी मिळेल.

10. मकर

नवीन आव्हानांना समोरे जावे लागेल. नवीन गोष्टी पाऊल टाकाल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेले पैसे मिळतील. धैर्याच्या जोरावर कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल.

11. कुंभ

अनेक चढ- उतारांना सामोरे जावे लागेल. स्वभावाच्या जोरावार अनेक कठीण प्रसंगावर सहज मात मिळवाल. नवीन नोकरी मिळू शकते.

12. मीन

मानसिक अस्वस्थता जाणवेल. बाहेर फिरण्याचा प्लान करु शकता. कामाच्या ठिकाणी मतभेद निर्माण होतील. व्यापारात अपेक्षित यश मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone: कोणत्या भाज्या कच्च्या खाऊ नयेत? किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी उपाय

Mumbai : लिंक रोड,टनेल रोड ते कोस्टल रोड, मुंबईचा कायापालट होणार ; मेट्रोच्या बड्या अधिकाऱ्यानं सांगितला रोड मॅप

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात राडा, मालतीने फरहानाला लाथ मारली अन् टेबल..., पाहा VIDEO

Processed Food Side Effect: जास्त प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने होतात 'हे' नुकसान, आजपासूनच घ्या काळजी

Maharashtra Live News Update: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी

SCROLL FOR NEXT