Winter Health yandex
लाईफस्टाईल

Winter Health : थंडीत घाम न येणं ठरू शकतं धोक्याचं; ब्रेन स्ट्रोक सारखे आजार लागतील मागे, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Winter Health Tips : एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्रोफेससर नवल विक्रम यांच्या मते, हिवाळ्यात शरीराला कमी घाम येतो.

Saam Tv

थंड वाऱ्यामुळे भारतातील तापमानात सातत्याने घट होत आहे. या थंडीच्या काळात आपण आपल्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि दम्याचा झटका येण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. या ऋतूत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्रोफेससर नवल विक्रम यांच्या मते, हिवाळ्यात शरीराला कमी घाम येतो. त्यामुळे रक्तदाब वाढू लागतो आणि त्याचा थेट परिणाम हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांवर होतो. याशिवाय शरीराला उबदार ठेवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे हृदयावर दबाव वाढतो.

कोलेस्टेरॉलचा शरीरावर परिणाम

राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉ तरुण कुमार सांगतात की, हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा लागते. या काळात हृदयाच्या नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे शिरा आकसतात. ही स्थिती हृदयरोग्यांसाठी घातक ठरू शकते.

AIIMS चे प्रोफेसर नवल विक्रम म्हणतात की , ब्रेन स्ट्रोकचा धोका हिवाळ्यात 30% वाढतो. अंगातून घाम येत नसल्यामुळे रक्तदाब वाढतो, जे ब्रेन स्ट्रोकचे मुख्य कारण बनते. अयोग्य रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूच्या पेशी मरायला लागतात. अनेक वेळा ही स्थिती इतकी गंभीर बनते की रुग्णाला वेळीच लक्षात येत नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा:

मीठाचे सेवन कमी करा आणि लोणी,तुपाचा कमी वापर करा.

कोमट पाणी पिणे आणि शरीर हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे.

घरामध्ये नियमित व्यायाम करा जेणेकरून शरीराला घाम येतो आणि रक्ताभिसरण व्यवस्थित राहते.

हृदय आणि मेंदूशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. थंडीत उबदार कपडे परिधान करणे महत्वाचे आहे. त्याने बाहेरच्या तापमानाचा शरीरावर परिणाम होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT