Saam Impact : रुग्णाला निर्जनस्थळी सोडणारा ससूनचा डॉक्टर निलंबित, साम टीव्हीच्या बातमीचा दणका

Pune sassoon Hospital Latest News: ससून रुग्णालयामध्ये एका बेवारस रुग्णाला उपचाराऐवजी डॉक्टरानेच निर्जनस्थळी नेऊन सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले.
SAAM IMPACT: ब्रेकिंग! रुग्णाला निर्जनस्थळी सोडणारा  'ससून'मधील डॉक्टर निलंबित; साम टीव्हीच्या बातमीनंतर कारवाई
Pune sassoon Hospital Latest News: Saamtv
Published On

सागर आव्हाड| पुणे, ता. २३ जुलै २०२४

ससून रुग्णालयातील एका डॉक्टराने उपचारासाठी आलेल्या बेवारस रुग्णाला उपचाराऐवजी निर्जनस्थळी सोडून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. याबाबत आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून अखेर तो डॉक्टर निलंबित करण्यात आला आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयामध्ये एका बेवारस रुग्णाला उपचाराऐवजी डॉक्टरानेच निर्जनस्थळी नेऊन सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी हे प्रकरण उघडकीस आणले, ज्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी केली होती. रविंद्र धंगेकर यांच्या या मागणीनंतर अखेर ससून हॉस्पिटलमधील डॉ आदीनाथ याला निलंबित करण्यात आले आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांना यासंबंधी अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी पत्र लिहले आहे.

SAAM IMPACT: ब्रेकिंग! रुग्णाला निर्जनस्थळी सोडणारा  'ससून'मधील डॉक्टर निलंबित; साम टीव्हीच्या बातमीनंतर कारवाई
Budget 2024 For Employees: खूशखबर! कर्मचाऱ्यांना पहिला पगार सरकार देणार; कसं असेल त्याचं गणित? अर्थसंकल्पात काय आहे तरतूद? वाचा सविस्तर

याबतीत चौकशी लावली आहे ,चौकशी करून कारवाई करू. अद्याप लेखी तक्रार प्राप्त झाली नाही. व्हिडीओ व्हायरल झाला तो मिळाला आणि आम्ही चौकशी लावली, असे म्हणत संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांनी दिले आहे.

SAAM IMPACT: ब्रेकिंग! रुग्णाला निर्जनस्थळी सोडणारा  'ससून'मधील डॉक्टर निलंबित; साम टीव्हीच्या बातमीनंतर कारवाई
Satara Politics: 'मॅचफिक्सिंग, नुरा कुस्ती चालणार नाही, वस्ताद योग्य उमेदवार देणार,' खासदार धैर्यशील मोहितेंचा जयकुमार गोरेंना टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com