देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात नोकरदारांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सरकार पहिल्या महिन्याचा पगार देणार आहे,अशी घोषणा निर्मला सितारामन यांनी केली. कर्मचारी आणि रोजगार निर्मिती करणाऱ्या दोघांनाही सरकार मदत करणार आहे. नवीन कर्मचाऱ्यांना १५००० रुपयांपर्यंत पगार सरकारकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सरकारच्या या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यात नवीन कंपनीतील नवीन कर्मचाऱ्याला पहिल्या महिन्याचा पगार सरकार देणार आहे. याशिवाय रोजगाराच्या पहिल्या चार वर्षांमध्ये EPFO मध्येही योगदान देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पहिल्या पगारात १५००० रुपयांपर्यंत सरकार मदत करेन. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे. याचसोबत रोजगारासंबंधित तीन योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
समजा तुमची पहिली नोकरी आहे. त्या नोकरीत तुमचा पीएफ कापला जात असेल, तर तुमच्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. तुम्ही इपीएफओला रजिस्टर झालात की तुम्हाला सरकारकडून तुमचा एक महिन्याचा पगार थेट खात्यात जमा होईल. तीन इन्स्टॉलमेन्टमध्ये ही रक्कम तुम्हाला दिली जाईल. ही इन्स्टॉलमेन्ट 15 हजार रुपयांपर्यंत असेल, असं वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा बजेटमध्ये करण्यात आली. चार वर्षांच्या नोकरीनंतर ईपीएफओकडून विषेष इन्सेन्टीव्हज थेट नोकरदाराला आणि नोकरी देणाऱ्या अशा दोघांनाही दिले जाणार आहे. त्या-त्या नोकरदाराच्या आणि नोकरी देणाऱ्याच्या इपीएफओ कॉन्ट्रीब्युशनप्रमाणे चार वर्षांनी हे इन्सेन्टीव्हज दिले जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे.
संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले की, सरकार नवीन कर्मचाऱ्यांना पहिल्या महिन्याचे पीएफ योगदान देऊन ३० लाख तरुणांना प्रोत्साहन देणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे सुरु करण्यात येणार आहेत.
याचसोबत रोजगारनिर्मितीबाबत अजून एक घोषणा केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला आर्थिक वर्षात १०० दिवसांचा रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट सरकारचे असल्याचे त्यांनी सांगितले.
budget 2024 finanace minister announces that new employees first month salary will given by government and epfo also sh04
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.