High cholesterol no symptoms dangerous saam tv
लाईफस्टाईल

Dyslipidemia : कोलेस्ट्रॉल वाढूनही लक्षणं दिसत नाहीयेत? हृदयासाठी धोकादायक ठरणाऱ्या 'या' समस्येवर काय उपाय, डॉक्टरांनी दिली माहिती

High cholesterol no symptoms dangerous: शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तरी सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. व्यक्ती पूर्णपणे निरोगी असल्यासारखी वाटते, पण आतून त्यांच्या रक्तवाहिन्यांना गंभीर नुकसान पोहोचत असते.

Surabhi Jayashree Jagdish

डिस्लिपिडेमिया ही अशी वैद्यकीय अवस्था आहे, ज्यामध्ये रक्तामध्ये लिपिड्स म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स यांचं प्रमाण असामान्य पातळीवर पोहोचतं. यात विशेषतः वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढणं, चांगल्या कोलेस्ट्रॉलची (एचडीएल) पातळी घटणं, किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढणं यांचा समावेश होतो. ही स्थिती हृदयविकार, अथेरोस्क्लेरॉसिस, हृदयविकाराचा झटका, आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढवू शकते.

या आजाराची विशेष गोष्ट म्हणजे, सुरुवातीला कोणतीही ठोस लक्षणं दिसून येत नाहीत. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचा थर जरी साचत असला तरी हृदयविकाराचा झटका किंवा इतर गुंतागुंत होईपर्यंत शरीराकडून कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया मिळत नाही. त्यामुळे अनेकदा या स्थितीचे निदान उशिरा होतं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी सुमारे २६ लाख मृत्यू आणि जवळपास ३ कोटी अपंगत्वाने बाधित जीवन वर्षे फक्त वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे घडत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

लक्षणं सामान्य पण दुष्परिणाम गंभीर

डिस्लिपिडेमिया ही अवस्था अनेक वेळा अशी लक्षणं दाखवते की ती दैनंदिन थकवा किंवा इतर किरकोळ त्रास वाटू शकतात. यामध्ये दिसून येणारी लक्षणं-

  • छातीत जडपणा किंवा वेदना

  • धाप लागणं

  • अंगात सतत थकवा वाटणं

  • चालताना किंवा शारीरिक श्रम करताना दम लागणं

  • रक्तदाबात चढ-उतार

  • हृदय वेगाने धडधडणं

  • वेळेत निदान व उपचार गरजेचं

मुंबईतील जसलोक हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. निहार मेहता यांच्या मते, “डिस्लिपिडेमिया ही सहज मॅनेज होऊ शकणारी स्थिती आहे. योग्य औषधोपचार, नियमित लिपिड तपासणी आणि जीवनशैलीत आवश्यक ते बदल यामुळे या आजारावर नियंत्रण ठेवता येते. ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे किंवा मधुमेहाशी झगडत आहेत, कुटुंबात कोलेस्ट्रॉलसंबंधित इतिहास आहे किंवा अनुवांशिक कारणांमुळे लिपिड पातळी वाढते, त्यांनी नियमितपणे लिपिड प्रोफाइल तपासणं अत्यावश्यक आहे."

लिपिडची योग्य पातळी कोणती?

वय, लिंग, शरीरयष्टी आणि इतर आरोग्यघटक लक्षात घेता लिपिडची आदर्श पातळी थोडीफार बदलू शकते. याची योग्य पातळी

  • एलडीएल (वाईट कोलेस्ट्रॉल): 100 mg/dL पेक्षा कमी

  • एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल): पुरुषांसाठी 40 mg/dL पेक्षा जास्त, स्त्रियांसाठी 50 mg/dL पेक्षा जास्त

  • ट्रायग्लिसराइड्स: 150 mg/dL पेक्षा कमी

  • एकूण कोलेस्ट्रॉल: 200 mg/dL पेक्षा कमी

योग्य जीवनशैली जोपासा

डिस्लिपिडेमिया पूर्णपणे बरा न होणारा असला तरी तो नियंत्रणात ठेवणं शक्य आहे. संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, वजन नियंत्रित ठेवणं, धूम्रपान आणि मद्यपान टाळणं, आणि साखर-मीठ-फॅट्सचे प्रमाण मर्यादित ठेवणं या सवयी अत्यंत फायदेशीर ठरतात. विशेषत: दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम ते तीव्र स्वरूपाचा व्यायाम करावा. औषधे वेळेवर घेणं आणि डॉक्टरांकडे नियमित फॉलो-अपसाठी जाणं या गोष्टी देखील पाळल्या पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT