Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

High Court Decision On Kabutarkhana: कबुतरखान्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं जैसे थे ठेवलाय. मात्र दुसरीकडे मुंबईच्या कबुतरखान्यावरून मराठी विरुद्ध जैन असा वाद पेटलाय. मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावेळी नेमकं काय झालं? जैन मुनी नेमकं काय म्हणाले? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
High Court Decision On Kabutarkhana
High Court Decision On Kabutarkhanasaam tv
Published On
Summary
  • हायकोर्टाकडून कबुतरखान्यांवरील बंदी कायम

  • जैन मुनींचं विधानावरून यु-टर्न

  • मीरारोडनंतर दादरमध्येही मराठी माणसाची गळचेपी

मुंबईत कबुतरखान्याचा वाद पुन्हा एकदा चिघळलाय.. मराठी एकीकरण समितीनं जैन समाजाच्या अवाजवी मागणीविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली. त्यानंतर कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ निघालेल्या आंदोलनातही पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. इतकचं काय समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचाही आरोप आहे. एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जैन समाजाच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिलयं.

दुसरीकडे शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींनी आपल्या विधानावरून यु-टर्न घेत शांतीपूर्ण उपोषण करण्याचं विधान केलयं. तसंच मराठी एकीकरण समितीचा गैरसमज झालाय, याप्रकरणात राज ठाकरेकडे जाणार असल्याचंही जैन मुनींनी सांगितलयं.

आधी मीरारोड आणि आता दादरमधील मराठी माणसाचं आंदोलन या दोन्ही आंदोलनात मराठी माणसाला ताब्यात घेऊन मुस्कटदाबी करण्याच प्रयत्न केला गेला.. मात्र जैन समाजाविरोधात पोलिसांनी कुठलीच ठोस भूमिका घेतली नाही.. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर कोणाचा दबाव आहे ? कबुतरखाना बंदीचा विषय सामाजिक आरोग्याशी निगडीत असतानाही या विषयाला धार्मिक रंग देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न कोण करतंय? हाच खरा सवाल आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या आधी मराठी विरुद्ध जैन वाद शमणार की आणखी वाढणार हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com