Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

arjun tendulkar News : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झालाय. प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांच्या नातीशी अर्जुनचा साखरपुडा झाल्याची माहिती मिळत आहे.
arjun tendulkar
arjun tendulkar NewsSaam tv
Published On

Arjun Tendulkar Engagement: टीम इंडियाचा माजी कर्णधार, मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला आहे. अर्जुनचा सानिया चंडोकशी साखरपुडा झाल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक रवी घई यांची नात असल्याची माहिती मिळत आहे. इंडिया टुडेनने अर्जुनच्या साखरपुड्याचं वृत्त दिलं आहे.

अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा साखरपुड्याला दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार उपस्थित होता. घई कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध आणि व्यावसायिक कुटुंब आहे. घई कुटुंब इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी (लो-कॅलरी आइस्क्रिम ब्रँड) मालक आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये अर्जुन तेंडुलकरने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाला नाही. मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसला रिटेन केलं होतं. परंतु संघाने अर्जुनला प्लेइंग इलेवनमध्ये स्थान दिलं नाही. त्यामुळे त्याच्या नावावर एक धाव किंवा विकेटची नोंद झाली नाही. त्याला संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसून होता.

arjun tendulkar
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जीवाला धोका, कोर्टात दिली खळबळजनक माहिती

अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत १७ फर्स्ट क्लास, १८ लिस्ट ए आणि २४ टी २० सामने खेळला आहे. फर्स्ट क्लास सामन्यात अर्जुनने ३३.५१ च्या सरासरीने ३७ गडी बाद केले आहेत. तर २३.१३ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत. तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये अर्जुनच्या नावावर २५ विकेट आहेत. तर १०२ धावांची नोंद आहे.

टी२० क्रिकेटमध्ये वयाच्या २५ व्या वर्षी अर्जुनने २५.०७ च्या सरासरीने २७ गडी बाद केले आहेत. तसेच १३.२२ च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. अर्जुन डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गोव्याच्या संघाचा भाग आहे. अर्जुन आधी मुंबईसाठी खेळत होता. अर्जुनने आयपीएलमध्ये मुंबईसाठी ५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३ गडी बाद केले आहेत. तर १३ धावा केल्या होत्या.

arjun tendulkar
Stray Dog Issue : मी २५०० भटक्या कुत्र्यांना मारून झाडाखाली गाडलं; आमदाराचा खळबळजनक दावा

सचिनने लग्न २४ मे १९९५ रोजी अंजलीशी केलं होतं. अंजली आणि सचिनच्या वयात ६ वर्षांचं अंतर आहे. सचिन आणि अंजलीला सारा आणि अर्जुन दोन मुले आहेत. साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ सालचा आहे. तर अर्जुनचा जन्म हा २४ सप्टेंबर १९९९ सालचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com