ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांना पोषण देण्यासाठी अनेकजण तेल लावतात. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या केसांनुसार वेगवेगळे तेल निवडते.
केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती, तसेच मजबूत केसांसाठी आठवड्यातून कितीवेळा तेल लावावे, जाणून घ्या.
तुम्ही तुमच्या केसांना नारळ, मोहरी, ऑलिव्ह, बदाम तेल लावू शकता. ही सर्व तेले तुमच्या केसांना पोषण आणि चमक देतील.
आठवड्यातून फक्त २ ते ३ वेळा केसांना तेल लावावे. यामुळे केसांची वाढ वाढेल आणि केस चमकदार होतील.
जर तुमचे केस ड्राय असतील तर केसांना ३ ते ४ वेळा तेल लावा. यामुळे केस मॉइश्चरायइज्ड राहतात.
जर तुमचे केस तेलकट असतील तर आठवड्यातून फक्त दोनदा तेल लावा. जास्त तेल लावल्याने केस अधिक तेलकट होतील.
शॅम्पूने केस धुण्याच्या २ ते ३ तास आधी केसांना तेल लावा. केसांना रात्रभर तेल लावू नका यामुळे केस जास्त गळतात.