ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला सुंदर दिसणे आवडते. मुली त्यांच्या केसांपासून ते नखांपर्यंत सर्व गोष्टींकडे खूप लक्ष देतात. तसेच स्टायलिश दिसण्यासाठी ते नेल पेंट लावतात.
सतत नेल पेंट लावल्याने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, जाणून घ्या.
जर तुम्ही सतत नेल पेंट आणि रिमूव्हर वापरत असाल तर यामुळे नखे पातळ होऊ शकतात आणि तुटू शकतात.
काही लोकांना नेल पेंटमधील केमिकलमुळे अॅलर्जी होऊ शकते, जसे की खाज सुटणे, जळजळ होणे.
नेल पेंटच्या तीव्र वासातील केमिकलमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो किंवा डोकेदुखी होऊ शकते.
नेल पेंट आणि आर्टिफिशियल नखांच्या खाली बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतो.
नेल पेंटमधील विषारी पदार्थ गर्भाच्या विकासावर नकारात्मक परिणाम करू शकतात. त्यामुळे गरोदर महिलांनी त्यापासून दूर राहावे.