Plant-based diet for cholesterol  saam tv
लाईफस्टाईल

Diet for high cholesterol: आता औषधं घेण्याची गरज नाही; वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर 'या' टीप्सचा करा वापर

Lifestyle changes for cholesterol: वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच लक्ष देऊन ते नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते नैसर्गिक उपाय आहेत

Surabhi Jayashree Jagdish

  • उच्च कोलेस्ट्रॉल हृदयविकाराचा धोका वाढवतो.

  • फायबरयुक्त अन्न वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते.

  • भाज्या-फळांमधील स्टेरॉल्स कोलेस्ट्रॉल शोषण कमी करतात.

उच्च कोलेस्ट्रॉल ही एक अशी समस्या आहे जी शरीरात हळूहळू वाढते. यामध्ये सुरुवातीला काही लक्षणं दिसत नाहीत मात्र पण हळूहळू हृदयविकार किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. चांगली गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नेहमी औषधांची गरज नसते. आहारात आणि जीवनशैलीत काही छोटे बदल केले, तरी त्याचा मोठा फायदा होतो.

वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात कोणते बदल केले पाहिजे ते जाणून घेऊया.

फायबरयुक्त अन्न खा

ओट्स, मसूर, चिया सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स यामध्ये सोल्युबल फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलशी संबंधित असतं. ते शरीरातून बाहेर टाकायला मदत करतं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मधील एका संशोधनानुसार दररोज फक्त ५–१० ग्रॅम सोल्युबल फायबर खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) सुमारे ५% ने कमी होऊ शकतं.

भाज्या आणि फळांचा समावेश

फळं, भाज्या, सुकामेवा आणि बिया यामध्ये प्लांट स्टेरॉल्स आणि स्टॅनॉल्स असतात. हे घटक शरीरात कोलेस्ट्रॉल शोषलं जाण्यापासून अडवतात. नॅशनल कोलेस्ट्रॉल एज्युकेशन प्रोग्रामनुसार दररोज साधारण २ ग्रॅम प्लांट स्टेरॉल्स घेतल्यास LDL कोलेस्ट्रॉल १०% पर्यंत कमी होतो. याशिवाय वनस्पतीजन्य आहारात अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तवाहिन्या सुरक्षित ठेवतात आणि फायबरमुळे कोलेस्ट्रॉलही कमी होतं.

ट्रान्स फॅट टाळा

प्रोसेस्ड स्नॅक्स, तळलेले पदार्थ आणि काही मार्गरीनमध्ये ट्रान्स फॅट्स असतात. हे फॅट्स वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढवतात आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) कमी करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, ट्रान्स फॅट्सऐवजी ऑलिव्ह ऑईल, एवोकॅडो, अक्रोड आणि मासे यासारखे हेल्दी फॅट्स वापरले पाहिजेत.

दररोज थोडा व्यायाम करा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी रोज जीमला जाण्याची गरज नाही. आठवड्यातून किमान ५ दिवस, दररोज ३० मिनिटं वेगाने चालणं देखील फायदेशीर ठरतं. यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते.

साखर आणि मैदा कमी करा

जास्त साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स यामुळे ट्रायग्लिसराईड्स वाढतात. हे हृदयविकाराचं मोठं कारण ठरतं. एका संशोधनानुसार, ज्यांच्या आहारातील २५% कॅलरी साखरेतून येतात त्यांना हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. साखरयुक्त पेयं, मिठाई, मैद्याची चपाती कमी केल्यास ट्रायग्लिसराईड्स कमी होतात आणि रक्तातील साखर स्थिर राहते.

उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणता आहार घटक फायदेशीर आहे?

सोल्युबल फायबरयुक्त अन्न वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

प्लांट स्टेरॉल्सचे कोलेस्ट्रॉलवर काय प्रभाव पडतात?

प्लांट स्टेरॉल्स शरीरात कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करतात.

ट्रान्स फॅट्स कोणत्या प्रकारच्या कोलेस्ट्रॉलवर परिणाम करतात?

ट्रान्स फॅट्स LDL वाढवतात आणि HDL कमी करतात.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी दररोज किती व्यायाम करावा?

आठवड्यातून ५ दिवस, दररोज ३० मिनिटे वेगाने चालणे पुरेसे आहे.

साखर आणि मैदा जास्त घेणे का धोकादायक आहे?

साखर आणि मैदा ट्रायग्लिसराईड्स वाढवून हृदयविकाराचा धोका वाढवतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

SCROLL FOR NEXT