कॅन्सर शब्द उच्चारला तरी अनेकांना धडकी भरते... पायाखालची जमीनच सरकते... त्यातही ब्लड कॅन्सर म्हटलं की ही भीती दुप्पट होते... मात्र आता भारतीय डॉक्टरांनी ब्लड कॅन्सरवर रामबाण उपाय शोधलाय.... अवघ्या 9 दिवसात ब्लड कॅन्सरचा खात्मा होणार आहे.... मात्र ब्लड कॅन्सरवरचा रामबाण उपाय कुणी शोधलाय? पाहूयात...
आयसीएमआर आणि तामिळनाडूच्या ख्रिस्तीयन मेडिकल कॉलेज वेल्लोरनं शोधलं औषध
वेलकारटी असं या औषधाचं नाव
पहिल्यांदाच रुग्णालयात बनवल्या CAR-T सेल्स
CAR-T सेल्सची ब्लड कॅन्सरच्या रुग्णांवर चाचणी केली
या टेस्टनंतर टी सेल्सला कॅन्सरविरोधात लढण्यात यश
टेस्टनंतर 80 टक्के लोकांमध्ये 15 महिन्यांपर्यंत कॅन्सर आढळला नाही
कॅन्सरच्या उपचारासाठी स्वस्त आणि वेगानं रिझल्ट देणारा पर्याय
मात्र हे औषध कॅन्सर ग्रस्तांसाठी संजीवनी ठरणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.. भारतात दरवर्षी 70 हजार रुग्णांचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू होतोय.. त्यामुळं या जीवघेण्या कॅन्सरवर 2023 मध्ये स्वदेशी थेरपी विकसित करण्यात आली होती... आता थेट कॅन्सरवर औषधच शोधण्यात आल्यानं कॅन्सरग्रस्तांना मृत्यूच्या कराल दाढेतून सुटका मिळणार हे निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.