No Shower Right Before Bed Saam tv
लाईफस्टाईल

No Shower Right Before Bed: सवय असेल तर आजच बदला! रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याची चूक करताय? जडू शकतात आजार

Side Effects Of Bath : आरोग्याच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी आंघोळ करणे घातक समजले जाते.

कोमल दामुद्रे

Should You Take A Shower Before Going To Bed : दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री छान झोप लागण्यासाठी आपल्यापैकी अनेक लोकांना रात्री आंघोळ करण्याची सवय आहे. अनेकांना असे वाटते की, रात्री आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटते व झोप देखील उडते.

अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याला अधिक प्राधान्य देतात. बरेच लोक दिवसातून दोनदा आंघोळ करतात. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी आंघोळ करणे घातक समजले जाते.

रात्री आंघोळ (Bath) केल्यानंतर दिवसभराचा थकवा दूर होऊन शांत झोप लागते असे अनेकांचे मत आहे. खरे तर तज्ज्ञांच्या मते, रात्री आंघोळ केल्याने आपल्या शरीरातील तापमान कमी होते, ज्यामुळे मेंदूला झोपचे संकेत मिळतात. परंतु, तज्ज्ञांच्या मते रात्री आंघोळ केल्याने शरीरातील तापमान वाढते ज्यामुळे झोपेचा त्रास होतो. तसेच शरीराला इतर नुकसानही होते.

1. झोपेत त्रास होऊ शकतो.

गरम पाण्याने (Water) आंघोळ केल्याने शरीरातील तापमान वाढू शकते. ज्यामुळे झोप येण्याची शक्यता कमी होते. जर तुम्हाला आंघोळ करायची असेल तर झोपण्यापूर्वी २ तास आधी कोमट पाण्याने आंघोळ करा.

2. हृदयाच्या हालचालीत वाढ

गरम पाण्याने आंघोळ केल्याने हृदयाची धडधड वाढू लागते. गरम पाण्यामुळे रक्तदाब वाढतो. तसेच तज्ज्ञ सांगतात की, जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदयावर ताण येऊ शकतो. ज्यामुळे आरोग्याच्या (Health) इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

3. केस खराब होऊ शकतात.

झोपण्यापूर्वी केस धुतल्यास आरोग्याला आणि केसांना हानी पोहोचू शकते. झोपताना उशीवर केस ठेवून झोपल्याने ओलावा शोषला जातो. तसेच हानिकारक बँक्टेरियाही वाढतात. ज्यामुळे कोंडा, टाळूवर खाज येणे, जळजळची समस्या उद्भवतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Stunt : 'मौत का कुआ'मध्ये स्टंटबाजी करताना भीषण अपघात, तरुण १५ फूट खाली पडला; घटनेचा थरारक Video Viral

Maharashtra Live News Update: लातूरच्या औसा रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला भीषण आग

E Sakal: ई सकाळची गरुडझेप! सलग दोन महिने वाचकांची सर्वाधिक पसंती

Tan Removing Tips: पावसाळ्यात त्वचा चिकट अन् काळी पडलीये? टॅनिंग दूर करण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Malegaon Bomb Blast Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर निकाल; सर्व आरोपी निर्दोष, इम्तियाज जलील यांची संतप्त प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT