Netflix Password Sharing Saam Tv
लाईफस्टाईल

Netflix Ends Password Sharing: नेटफ्लिक्सचा युजर्सना झटका! मित्रांना नो पासवर्ड शेअरिंगचा Rule,जाणून घ्या नेमका बदल

Netflix Password Sharing Rules In India : भारतातील Netflix वापरकर्ते यापुढे पासवर्ड शेअर करू शकणार नाहीत.

कोमल दामुद्रे

Netflix Ends Password Sharing In India: कंटेंट विश्वातील दिग्गज नेटफ्लिक्स काही दिवसांपासून पासवर्ड शेअरिंगला विरोध करत आहे. यासाठी कंपनीने अनेक क्षेत्रांमध्ये पासवर्ड शेअर करणे बंद केले आहे किंवा त्यावर शुल्क आकारले आहे. म्हणजेच, जर तुम्ही पासवर्ड शेअर केला असेल तर तुम्हाला त्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल.

20 जुलैपासून कंपनी भारतातही हा नियम लागू करत आहे. म्हणजेच भारतातील Netflix वापरकर्ते यापुढे पासवर्ड शेअर करू शकणार नाहीत. कंपनीचे असे मत आहे की, पासवर्ड शेअरिंगमुळे कंपनी तोट्यात आहे.

2023 च्या सुरुवातीला कंपनीने अमेरिकेत पासवर्ड (Password) शेअरिंगवर बंदी आणली होती. यानंतर, कंपनीने में महिन्यात ही पॉलिसी 100 हून अधिक देशांमध्ये विस्तारली. यासाठी कंपनीने ईमेल मार्फत ग्राहकांशी संपर्क साधला. यामध्ये युजर्सना अकाउंटच्या (Account) वापराबाबत काही स्टेप्सची माहिती दिली जाईल. नेटफ्लिक्सने गुरुवारी 20 जुलै रोजी सकाळी नवीन नियमांची (rules) माहिती दिली आहे. अपडेटनुसार, नेटफ्लिक्स सुरुवातीला एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर एकच खाते वापरणाऱ्या वापरकर्त्यांना ईमेल पाठवेल.

या ईमेलमध्ये फक्त एक कुटुंब एकच खाते वापरू शकते असे सांगण्यात आले आहे. कुटुंबाबाहेरील व्यक्तीला त्याचे प्रोफाईल दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करावे लागेल. कंपनी या ईमेलमध्ये डिव्हाइस ट्रॅक करण्यासाठी एक लिंक देईल. त्यावर क्लिक करुन तुम्ही ज्या डिव्हाइसेसमध्ये तुमचे खाते लॉग इन केले आहे ते ट्रॅक करू शकता.

तुमचे खाते दुसऱ्या डिव्हाइसेमध्ये लॉग इन केल्यास, तुम्ही ते लॉग आउट देखील करू शकता. याशिवाय तुम्हाला पासवर्ड बदलण्याचाही पर्याय आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जर बाहेरील कोणी तुमचे खाते वापरत असेल तर तो त्याचे प्रोफाईल दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकतो.

1. पासवर्ड शेअरिंग का थांबवले?

भारतात, तुम्ही एकाच घरातील वेगवेगळ्या डिव्हाइसवर Netflix खाते वापरू शकता. याचा फायदा घेत लोक एकच अकाउंट वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करत होते. परंतु आता तुम्ही तसे करू शकणार नाही.

2. Netflix कसे थांबेल?

वापरकर्त्यांना रोखण्यासाठी नेटफ्लिक्स अनेक प्रकारचे निर्बंध लादू शकते. यामुळे, वापरकर्त्यांना एकच खाते वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरणे कठीण होणार आहे. यासाठी कंपनी व्हेरिफिकेशन कोड आणि वाय-फाय अॅक्सेस यांसारखी अनेक वैशिष्ट्ये जोडू शकते.

वापरकर्त्यांना दर 7 दिवसांनी नेटफ्लिक्समध्ये प्रवेश करण्यासाठी एक कोड प्रदान करावा लागेल. याशिवाय, दर 31 दिवसांनी तुम्हाला तुमचे डिव्हाइस वाय-फाय किंवा इंटरनेटशी कनेक्ट करावे लागेल. याचा वापर तुम्ही प्रवास करताना देखील व्यवस्थितरित्या करु शकतात

3. योजना किती आहे?

भारतात Netflix चे सबस्क्रिप्शन 149 रुपये मासिक शुल्कावर येते. यामध्ये तुम्हाला फक्त मोबाइलवरचा याचा वापर करता येईल तर दुसरीकडे दुसरा प्लान ६४९ रुपयांचा आहे, जो मासिक प्रीमियम प्लान आहे. यामध्ये युजर्सना अल् एचडी कंटेंट मिळेल, जो तुम्ही चार उपकरणांवर अॅक्सेस करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

Maharashtra News Live Update: रामदास कदम यांच्या वक्तव्याचा रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध; रायगडमध्ये आंदोलनाचा इशारा

Custard Apple : लांबसडक अन् घनदाट केसांसाठी सीताफळ फायदेशीर, 'असा' करा वापर

Health Tips : किती वर्षे दारू पिल्यानंतर लिवर खराब होतं? डॉक्टरांचा खुलासा वाचून आजच प्यायची बंद कराल

SCROLL FOR NEXT