Flood Damaged Cars-Bikes : पूराच्या पाण्यात कार-बाईक वाहून गेली? पावसामुळे नुकसान झाले? या सोप्या टिप्स फॉलो करा मिळेल रिफंड

What To Do When Your Two-Wheeler Is Submerged In Flood Water : मुसळधार पाऊस आणि पुरामुळे तुमची कार किंवा बाईक वाहून गेल्यास काय कराल ?
Flood Damaged Cars-Bikes
Flood Damaged Cars-BikesSaam Tv
Published On

Quick Tips To Repair A Bike Damaged By Flood : पावसाळा सुरु झाला की, सर्वत्र पाणीच पाणी असते. या काळात सगळीकडे पूरपरिस्थिती उद्भवते त्यामुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अचानक आलेल्या पुरात विविध ठिकाणी पार्क केलेल्या गाड्या खेळण्यांप्रमाणे वाहून गेल्याचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत.

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे तुमची कार किंवा बाईक वाहून गेल्यास, तुम्ही त्यासाठी विमा संरक्षणाचा दावा करू शकता. जर तुम्ही तुमच्या कार व बाईकवर विमा काढला असल्यास तुम्हाला नक्कीच नुकसान भरपाई मिळेल. कसे ते जाणून घेऊया सविस्तर

Flood Damaged Cars-Bikes
Monsoon Car Driving Tips: पावसाळ्यात कार घेऊन फिरायला जाताय ? ड्राइव्ह करण्यापूर्वी या गोष्टी तपासून मगच घराबाहेर पडा !

1. FIR दाखल करा

पुरामुळे तुमची कार (Car) वाहून गेली असेल, तर तुम्हाला सर्वात आधी जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे. पावसाचा वेग थांबल्यानंतर काही काळाने आपल्याला कार किंवा बाईक (Bike) मिळते. पण ती न मिळाल्यास आपले नुकसान झाल्याचे समजते. अशावेळी विमा कंपनी कारचे विमा (Insurance) उतरवलेले घोषित मूल्य किंवा IDV देते. कारच्या दुरुस्तीचा खर्च IDV च्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त असतो.

2. विमा कंपनीला कळवा

वाहनाचे नुकसान झाल्यास त्वरित विमा कंपनीला कळवा. अशा परिस्थितीत, विमा कंपनीला कळवण्यापूर्वी आणि सल्ला घेण्यापूर्वी स्वतःहून काहीही करू नका . तसेच, नुकसान झाल्यास, पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर विमा प्रदात्याला कळवा, कारण ही कागदपत्रे कायदेशीर पुरावा मानली जातील.

Flood Damaged Cars-Bikes
Bike Engine Oil Tips: बाईकचे इंजिन ऑइल कधी बदलायचे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बसेल पैशांचा फटका !

3. कार गॅरेजमध्ये घेऊन जा

जर वाहन सापडले आणि खराब झाले तर, तुमचा विमा प्रदाता आवश्यक तपासणी आणि दुरुस्तीसाठी वाहन गॅरेजमध्ये टोइंग करण्यात मदत करेल. त्यासाठी तुमच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे भरुन घेतली जातील. यानंतर, विमा कंपनी वाहनाच्या नुकसान किती झाले हे तपासेल व त्याची दुरुस्ती करेल. जर ती दुरुस्त करण्यायोग्य नसेल, तर तुम्ही काही नियमानुसार नवीन कार-बाईक विकत घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com