APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Sangli market committee turmeric rate update today : सांगलीच्या वसंतदादा शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत पार पडलेल्या लिलावात उच्च दर्जाच्या हळदीला प्रतिक्विंटल तब्बल ६५ हजार रुपयांचा ऐतिहासिक विक्रमी दर मिळाला आहे.
Sangli market committee turmeric rate update today
Sangli market committee turmeric rate update todaysaam tv
Published On: 

विजय पाटील, साम प्रतिनीधी

संपूर्ण देशात 'हळदीचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (मार्केट यार्ड) एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घटना घडली आहे. दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या हळदीच्या विशेष सौद्यांमध्ये सांगलीच्या इतिहासातील सर्वात उच्चांकी असा दर हळदीला मिळाला आहे. येथील प्रसिद्ध 'राजापुरी लोकल सेलम' हळदीला प्रति क्विंटल तब्बल ६५ हजार रुपयांचा दर मिळाला असून, या ऐतिहासिक दरामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.

दीपावली पाडव्यानिमित्त आयोजित या हळदीच्या सौद्यांना सांगली मार्केट कमिटीचे सभापती आनंदराव नलवडे आणि सचिव महेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने सुरुवात करण्यात आली. पाडव्याच्या मुहुर्तावर झालेल्या या लिलावात हळदीला मिळालेला हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक मानला जात आहे.

Sangli market committee turmeric rate update today
'मला धमकी देऊ नका,मीही पाटील आहे'; सतेज पाटलांचा चंद्रकांतदादांना सणसणीत टोला

विशेष म्हणजे, या विक्रमी सौद्यामध्ये मार्केट कमिटीचे सभापती आनंदराव नलवडे यांच्याच शेतात झालेली राजापुरी लोकल सेलम हळद विक्रीसाठी आली होती, जिला हा सर्वोच्च ६५ हजार रुपयांचा दर मिळाला. ही उच्च दर्जाची हळद 'शहा' नामक नामांकित व्यापाऱ्याने खरेदी केली. सांगली मार्केट यार्डच्या इतिहासात यापूर्वी हळदीला जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला होता. मात्र, यंदाच्या पाडव्याच्या मुहूर्तावर हा आकडा थेट ६५ हजारांवर पोहोचल्याने बाजार समितीच्या इतिहासात एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Sangli market committee turmeric rate update today
मोठी बातमी! शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, ऐन दिवाळीतील कारवाईने खळबळ

याच सोबत, याच दिवशी झालेल्या सौद्यांमध्ये गुळाला देखील प्रति क्विंटल ५४०० रुपयांपर्यंतचा चांगला दर मिळाला. हळद आणि गूळ या दोन्ही प्रमुख शेतमालाला मिळालेल्या या उंचावलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य दाम मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या अभूतपूर्व उच्चांकी दरामुळे शेतकरीवर्गात मोठा उत्साह दिसून येत असून, शेतकरी, व्यापारी आणि अडत बाजारातील सर्व घटकांनी यावर तीव्र समाधान व्यक्त केले आहे. सांगलीच्या बाजार समितीमधील या ऐतिहासिक उड्डाणामुळे आगामी काळात हळद उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगले दिवस येतील आणि आर्थिक सुबत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.