Narali Purnima Special SAAM TV
लाईफस्टाईल

Narali Purnima Special : सणासुदीला घरीच शहाळ्यापासून बनवा गारेगार आईस्क्रीम, कशी ते वाचा

Coconut Ice Cream Recipe : नारळी पौर्णिमेला घरात झटपट शहाळ्यापासून आईस्क्रीम बनवा आणि सणाचा गोडवा वाढवा. सोपी रेसिपी नोट करा.

Shreya Maskar

श्रावण महिन्यात यंदा १९ तारखेला नारळी पौर्णिमा हा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करून समुद्रात नारळ अर्पण करतात. घरी आणि देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. सणासुदीला खाण्यापिण्याचे पदार्थ महाग मिळतात. त्यामुळे बाहेरचे महागडे पदार्थ खाण्यापेक्षा घरीच छान पदार्थ बनवा.

नारळी पौर्णिमेला नारळाला खूप महत्त्व असते. या दिवशी नारळापासून अनेक पदार्थ बनवले जातात. यंदा तुम्ही सुद्धा नारळापासून खास पदार्थ बनवू शकता. नारळी पौर्णिमेला घरीच झटपट शहाळ्यापासून आईस्क्रीम तयार करा. आईस्क्रीम तुमचा मूड छान करून, तुम्हाला रिफ्रेश करेल. तसेच मुलं देखील आवडीने याचा आस्वाद घेतील.

साहित्य

  • शहाळ्याची मलई

  • शहाळ्याचं पाणी

  • नारळाचं दूध

  • व्हिप क्रीम

  • कंडेन्स मिल्क

  • व्हॅनिला इसेन्स

  • सुकामेवा

कृती

शहाळ्याचा गारेगार आईस्क्रीम तयार करण्यासाठी सर्वप्रथम शहाळ्याची मलई काढून त्यात शहाळ्याचं पाणी आणि नारळाचं दूध घालून मिक्सरला ब्लेंड करुन घ्या. आता एका बाऊलमध्ये व्हिप क्रीम टाकून छान फेटून घ्या. त्यानंतर यात कंडेन्स मिल्क, व्हॅनिला इसेन्स, शहाळ्याची मलईच मिश्रण घालून सर्व एकजीव करून घ्या. हे सर्व मिश्रण हाताने फेटून घ्या. आता या मिश्रणात बारीक कापलेला सुकामेवा आणि शहाळ्याची बारीक तुकडे घाला. अ‍ॅल्युमिनियमची भांड्यात आईस्क्रीमच मिश्रण टाकून रेफ्रिजरेटरमध्ये १० ते १२ तासांसाठी सेट होण्यासाठी सोडा. अशा प्रकारे गारेगार शहाळ्याचा तयार झाला.

शहाळ्यातील मलई आरोग्यास फायदेशीर

  • शहाळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपली पचनक्रिया निरोगी राहते.

  • शहाळ्यातील मलई रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

  • शहाळ्यातील मलईमध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

  • शहाळ्यातील मलईमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

  • मलई खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. परिणामी वजन कमी होते.

  • शहाळ्यातील मलईमुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्वचा तजेलदार होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT