Monsoon Trip With kids
Mumbai Garden SAAM TV
लाईफस्टाईल

Mumbai Garden : लहान मुलांना पावसाळ्यात फिरायला घेऊन जाताय? मग मुंबईतील या सेफ ठिकाणी जा

Shreya Maskar

पावसाळा लहान मुलांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद देतो. पावसात आपण कुटुंबासोबत फिरण्याचे विविध प्लान करतो. पावसात आपण समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेतो, ट्रेकचे प्लान करतो. तसेच विविध धबधब्याने देखील भेट देतो. पावसाचा मनसोक्त आनंद लुटतो. पण लहान मुलांना आपण अशा ठिकाणी फिरायला घेऊन जात नाही कारण मुलांसाठी येथे थोडा धोका असतो.

पावसात मुलांना फिरायला कुठे घेऊन जायचे? असा प्रश्न पडतो. कारण सर्वात जास्त लहान मुलं पावसाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतात. तर या पावसात मुलांसोबत करा मुंबईची सफर. मुंबईतील 'या' उद्यानाला भेट द्या आणि मुलांसोबत पावसाचा आनंद लुटा. येथे मुलांना निसर्गाचा जवळून अनुभव घेता येईल.

कमला नेहरू पार्क

कमला नेहरू पार्क हँगिंग गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे. हे उद्यान मलबार टेकडीच्या माथ्यावर आहे. मुंबईला आल्यावर पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात.या ठिकाणाहून तुम्हाला मुंबई शहराचे सुंदर दर्शन घेता येते. हे उद्यान मेहता गार्डनर म्हणून ओळखले जाते. येथे तुम्हाला प्राण्याच्या आकारामध्ये कापलेली सुंदर झाडे पाहायला मिळतील. या उद्यानातील म्हातारीचा बूट हे पर्यटकांचे आकर्षण आहे.लहान मुलांना बुटासोबत खेळण्यामध्ये खूप मज्जा करता येईल. फोटोशूटसाठी कमला नेहरू पार्क हे उत्तम ठिकाण आहे. या उद्यानात तुम्हाला विनाशुल्क प्रवेश आहे. हे उद्यान सकाळी ६ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत उघडे असते. कमला नेहरू पार्क हे पश्चिम रेल्वेच्या ग्रँड रोड स्टेशनपासून जवळ आहे.

जिजामाता उद्यान

जिजामाता उद्यान हे जगभरात राणीची बाग म्हणून प्रसिद्द आहे. लहान मुलांना विविध प्राणी,पक्षी आणि झाडांची माहिती करून देण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. राणीची बाग खूप मोठी आहे.त्यामुळे तुमचा एक दिवशी सहलीचा प्लान या ठिकाणी चांगला होऊ शकतो. मोठ्या माणसांना देखील येथे आनंद घेता येईल. राणीच्या बागेमध्ये खाण्यापिण्याची उत्तम सोय केलेली आहे. राणीची बाग ही भायखळा येथे आहे. फ्लेमिंगो आणि पेंग्विन पाहण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी असते.मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्थानकावरून राणीची बाग जवळ आहे. या रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आहे. हे उद्यान सायंकाळी ६ पर्यंत उघडे असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship: मैत्री खरी की खोटी 'या' गोष्टीतून ओळखा, जाणून घ्या फ्रेंडशिपमधील रेड फ्लॅग

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : 'या' तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा होणार

Anant Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्न संगीत समारंभात कोणकोणते सेलिब्रिटी करणार परफॉर्मन्स ? पाहा लिस्ट

Team India: वर्ल्डकपचे हिरो वर्षा बंगल्यावर! रोहितसह या 3 खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सत्कार- VIDEO

Marathi Live News Updates: पेपर लीक प्रकरणी केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

SCROLL FOR NEXT