Kadyavarcha Ganpati : महाराष्ट्रातील 'या' जागृत देवस्थानाला भेट द्या, इच्छापूर्ती सोबत होईल सुंदर निसर्गाची अनुभूती

Ratnagiri Kadyavarcha Ganpati : रत्नागिरीला फिरायला गेल्यावर पर्यटक कड्यावरच्या गणपतीला आवर्जून भेट देतात. हे एक जागृत देवस्थान आहे.
Ratnagiri Kadyavarcha Ganpati
Kadyavarcha GanpatiSAAM TV

कड्यावरचा गणपती हे महाराष्ट्रतील प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे. दापोली तालुक्यातील जोग नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. कड्यावरचा गणपती रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले गावात आहे. हे एक प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे.दाट हिरवळ समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या दूर असलेल्या टेकडीवर हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोकणाचे अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते.

कड्यावरच्या गणपतीचे मंदिर सहाशे वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. पेशवेकालीन वास्तुरचनेचा हा उत्तम नमुना आहे. पूर्वी हे मंदिर आंजर्ले गावातील समुद्राच्या काठी होते. पण समुद्राची पातळी वाढल्यामुळे हे मंदिर पाण्याखाली गेले. त्यामुळे समुद्रापासून दूर असलेल्या एका टेकडीवर हे मंदिर आता बांधण्यात आले आहे. त्यावेळी मंदिराच्या वाटेवर लोकांना गणेशाच्या पावलांच्या खुणा दिसून आल्या होत्या, असे गावकऱ्यांचे मत आहे. मंदिराच्या जीर्णोद्धार झाल्यानंतर कड्यावर गणपतीचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिरात श्री गणेशाची सुबक आणि देखणी मूर्ती आहे. गणपतीच्या मूर्ती शेजारी रिद्धिसिद्धिच्या देखील उंच मूर्ती आहेत.

Ratnagiri Kadyavarcha Ganpati
Udaipur Place To Visit: सुट्टीत राजेशाही थाट अनुभवा, उदयपूर मधील 'या' निसर्गरम्य ठिकाणांची सफर करा..

या मंदिराची त्रिस्थळी रचना आहे. यात सभागृह, अंतराळ, गर्भगृह येते. मंदिराला गोल घुमट देखील आहे. घंटानादाने संपूर्ण मंदिर दुमदुमून निघते. मंदिरातील गणपतीची मूर्ती ही पूर्वाभिमुखी उजव्या सोंडेची आहे. ही गणपतीची मूर्ती बेसॉल्ट खडकांपासून बनवलेली आहे. तर हे मंदिर पांढऱ्या दगडांनी बांधण्यात आले आहे. या मंदिराचा आवार स्वच्छ आणि सुंदर असून गणपती मंदिरासमोर तलाव देखील आहे. या टेकडीवर अजरालयेश्वर हे शंभूमहादेवाचे मंदिर देखील आहे.

Ratnagiri Kadyavarcha Ganpati
Pune Waterfalls : आकाशातील सूर्यकिरणे थेट धबधब्यावर; पावसाळ्यात पुण्यातील 'या' ५ ठिकाणी नक्की भेट द्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com