Pune Waterfalls : आकाशातील सूर्यकिरणे थेट धबधब्यावर; पावसाळ्यात पुण्यातील 'या' ५ ठिकाणी नक्की भेट द्या

Monsoons Trip: डोंगर, दाऱ्या आणि त्यातून बर्फासारखा फेसाळणारा धबधबा प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतो. येथे आल्यावर तासंतास येथेच थांबावे असे प्रत्येकाला वाटते.
Monsoons Trip
Pune Waterfalls Saam TV
Published On

पावसाळ्यात अनेक पर्यटक पुण्यामध्ये धबधब्यांच्या शोधत येतात. सर्वत्र हिरवी गर्द झाडी, डोंगर, दाऱ्या आणि त्यातून बर्फासारखा फेसाळणारा धबधबा प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतो. येथे आल्यावर तासंतास येथेच थांबावे असे प्रत्येकाला वाटते. आता तुम्ही सुद्धा पुण्यातील काही धबधब्यांच्या शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर धबधब्यांची यादी आणली आहे.

Monsoons Trip
Monsoon Makeup Care: पावसाळ्यात जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवण्यासाठी 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

ताम्हिणी घाट

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द झाडी आणि त्यातून फेसळणारा धबधबा ताम्हिणी घाटाचे सौंदर्य आणखी वाढले आहे. पुण्यापासून हे ठिकाण 93 किलोमिटर अंतरावर आहे. त्यामुळे रोड ट्रीपचा प्लान असेल तर येथे आवश्य भेट द्यावी.

लिंगमळा धबधबा

पुण्याजवळील लिंगमळा धबधबा डोळ्यांचं पारण फेडणारा धबधबा आहे. या धबधब्याची उंची तब्बल 500 फूट इतकी आहे. एवढ्या मोठ्या उंचिवरून हा धबधबा खाली वाहतो. पहिल्यांदाच येथे भेट देणारी व्यक्ती थक्क होते. उंचावरून थेट खाली खडकांवर पाणी आदळतं. त्यामुळे येणारा आवाज फार मोठा असतो. हा धबधबा पुण्यापासून जवळपास 131 किलोमीटर अंतरावर आहे.

चायनामन्स धबधबा

चायनामनचा धबधबा पुण्यापासून 121 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर या सुंदर शहरात हा धबधबा वाहतोय. पावसाळ्यात तुम्ही महाबळेश्वरला देखील फिरायला जाण्याचा प्लान करू शकता. पुण्यातून बाय रोड येथे जाण्यासाठी जवळपास 2 तासांचा वेळ लागतो. तुम्ही येथे मस्त फोटोशूट सुद्धा करू शकता.

ठोसेघर धबधबा

पुण्यातील निसर्गाच्या सुंदरतेचं महत्वा सांगणारा ठोसेघर हा आणखी एक सुंदर धबधबा आहे. पुण्यापासून 133 किलोमीटर अंतरावर ठोसेघर धबधबा आहे. येथील संपूर्ण परिसरात लहान मोठ्या टेकड्या आहेत. बायरोड येथे पोहचण्यासाठी पुण्यातून पुढे अडिच तासांचा प्रवास करावा लागेल.

भाजे धबधबा

धबधबा वाहत असताना आकाशातून सूर्यकिरणे थेट यावर पडतात. त्यामुळे या धबधब्याचं सौंदर्य अनन्यसाधारण आहे. तुम्ही विचारही करू शकणार नाही त्याहून सुंदर हा धबधबा दिसतो. लोणावळ्यातील 22 दगडी लेण्यांजवळ हा धबधहबा आहे. पुण्यापासून 61 किमी आणि मुंबईपासून 90 किमी अंतरावर भाजे धबधबा आहे. मित्रांसह तुम्ही येथे एन्जॉय करू शकता.

Monsoons Trip
Monsoon Session Video: पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी; विरोधक ड्रग्ज, महागाई, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com