Shreya Maskar
कर्जतमधील भिवपुरी धबधबा पर्यटनाचे आकर्षण आहे. पावसात हिरवागार निसर्गाचा येथे अनुभव घेता येतो.
पांडवकडा धबधबा नवी मुंबई मधील खारघर येथे आहे. पांडवकडा टेकड्यांमध्ये वसलेला आहे.
कर्जतमधील सोलनपाडा धबधबा हा सोलानपाडा धरणावर बांधण्यात आला आहे.
चिंचोटी धबधबा पालघर जिल्ह्यात आहे. हे उत्तम ट्रेकिंगचे ठिकाण आहे. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तुम्हाला येथे पाहता येतील.
मुंबईजवळील भगीरथ धबधबा हा वांगणी धबधबा म्हणूनही ओळखला जातो. पावसात कुटुंबासोबत फिरण्याचे उत्तम ठिकाण आहे.
पावसात एक दिवसाच्या ट्रिपसाठी लिंगमाळा धबधबा उत्तम ठिकाण आहे. मुंबईपासून ५ तासांच्या अंतरावर हे निसर्ग सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळेल.
अहमदनगर जिल्ह्यात रंधा धबधबा आहे. हा धबधबा प्रवरा नदीवर आहे.
पुण्याजवळील बेंदेवाडी धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे. पावसात या धबधब्याला भेट देऊन तुम्ही निसर्गाचे अद्भुत रूप पाहू शकता. Canva
खंडाळा येथील कुणे धबधब्याला पावसात आवर्जून भेट द्या. फोटोशूटसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
कर्जतमधील मोहिली धबधबा उल्हास नदी ओलांडून समोरच्या डोंगरात आहे.