Shreya Maskar
मुंबई शहराला समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य लाभले आहे. उंच लाटा आणि थंडगार वारा येथे मनसोक्त अनुभवता येतो.
मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात एक सुंदर संध्याकाळ तुम्हाला घालवायची असेल, तर मुंबईतील वर्सोवा बीचला आवर्जून भेट द्या.
वर्सोवा बीच मुंबईतील इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा शांत आहे. येथे तुम्ही स्वतःसोबत छान वेळ घालवू शकता.
वर्सोवा समुद्रकिनारा कोरड्या काळ्या आणि पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे.
वर्सोवा बीचला जाण्यासाठी तुम्ही अंधेरी मेट्रोने वर्सोवा स्टेशनला उतरावे. त्यानंतर स्टेशनपासून तुम्ही चालत किंवा रिक्षाने सुद्धा जाऊ शकता.
पावसात किंवा संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत, मित्रमंडळीसोबत, कुटुंबासोबत तुम्ही वर्सोवा बीचला जाऊ शकता. लहान मुलांना देखील मजा करता येईल असा सुंदर निसर्ग येथे आहे.
वर्सोव्याच्या समुद्रात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच समुद्रकिनारी घोडेस्वारी देखील करू शकता.
वर्सोवा बीचला बाहेर अनेक खाण्याचे कॅफे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ येथे तुम्हाला खायला मिळतील.
वर्सोवा बीच फोटोशूटसाठी हे उत्तम ठिकाण आहे.