Thane Waterfall : ठाण्यात निसर्गाच्या कुशीत दडलेला धबधबा; घोडबंदर रोडपासून काही मिनिटांत पोहचाल

Waterfall In Thane : फेसाळणारा धबधबा लांबून पाहायला फार छान वाटतो. फॅमिली किंवा मित्र परिवारासह आता सर्वजण जवळच्या धबधब्यांना शोधत असतील.
Waterfall In Thane
Thane Waterfall Saam TV

राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यातही काही शहरांत पाऊस बरसत आहे. आता पावसाळा म्हटलं की धबधबा आणि पिकनीक आलीच. फेसाळणारा धबधबा लांबून पाहायला फार छान वाटतो. फॅमिली किंवा मित्र परिवारासह आता सर्वजण जवळच्या धबधब्यांना शोधत असतील.

Waterfall In Thane
Mesmerising Waterfalls in India: पावसाळ्यात धबधब्यांवर जायचा प्लान करताय? मंत्रमुग्ध करणारे हे टॉप 5 धबधबे बघाच!

आता तुम्ही ठाण्यात राहत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास धबधबा शोधून आणला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड पिरसरातून या हिडन धबधब्याला भेट देता येईल. मात्र अनेक ठाणेकरांना याबद्दल काहीच माहिती नाहीये. त्यामुळे आम्ही आज या धबधब्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत. शिवाय येथे जायचं कसं हे देखील सांगणार आहोत.

वाचा कसं जायचं?

ठाण्यातील या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्हाला ठाणे स्टेशनवरून घोडबंदर रोड गाठावा लागेल. तेथून पुढे डी मार्टचा रस्ता लागेल. डी मार्टच्या डाव्या बाजूला एक रस्ता जातो. त्या रस्त्याने सरळ पुढे जायचे. पुढे गेल्यावर काही मिनिटांनी ज्ञानगंगा कॉलेज लागेल. तसेच काही अंतरावर चिरमा देवी मंदिर लागेल. येथून सुद्धा तुम्हाला सरळ ७ ते ८ मिनिटे चालत जावे लागेल.

त्यानंतर गावासारखा परिसर सुरू होईल. निसर्गाच्या कुशीत लपलेला हा धबधबा पाहण्यासाठी गावातून छोटी पाऊल वाट आहे. अशा पद्धतीने तुम्ही या धबधब्यापर्यंत पोहचू शकता. येथे तुमच्या फॅमिलीसोबत देखील भेट देऊ शकता.

या धबधब्याचं नाव काय आहे ते समजलेलं नाही. मात्र हा एक छोटा धबधबा आहे. या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे या बद्दल जास्त कुणाला माहिती नाही. फक्त येथील स्थानीक नागरिकांना हा धबधबा माहिती आहे. या धबधब्याबद्दल गुगल मॅपवर सुद्धा काहीच माहिती नाही. @Grishma Udayawar या युट्यूब चॅनलवर धबधब्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यातूनच ही माहिती घेण्यात आली आहे.

धबधब्यावर गेल्यानंतर तेथे लहान मुलांना जास्त एन्जॉय करता येत नाही. शक्यतो पालक आपल्या लहान मुलांसह अशा ठिकाणी जात नाहीत. मात्र हा धबधबा अगदी लहान असल्याने तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत देखील येथे भेट देऊ शकता.

Waterfall In Thane
Maharashtra's Reverse Waterfall: उलट्या दिशेने वाहणारा धबधबा! महाराष्ट्रातील भन्नाट ठिकाण आहे तरी कुठे? वाचा कसं जायचं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com