ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात असे अनेक धबधबे आहेत ज्यामुळे देशाचे नैसर्गिक सैंदर्य प्रदर्शित होते.
पावसाळा सुरु होताच अनेक जण आपल्या परिवारासोबत सुट्टी घालवण्यासाठी जातात. भारतातील अनेक धबधब्यांवर पावसाळ्यात प्रचंड गर्दी पहायलवा मिळते.
गोव्यातील दूधसागर धबधबा भारतातील सर्वात उंच आणि आश्चर्यकारक धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा गोव्यामधील मांडोवी नदीवर स्थित आहे.
मेघालयातील नोहकालिकाई धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा मानला जातो. हा धबधबा राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी आहे.
केरळमधील अथिरापल्ली फॉल्स बाहुबली वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो. ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली या चित्रपटातील शुटिंग येथे झाली होती.
कर्नाटकातील शिवनसमुद्र धबधबा भारतातील दुसरा सर्वात मोठा धबधबा आहे. हा धबधबा सुमारे ८५० मीटरमध्ये पसरलेला आहे.
छत्तीसगडमधील चित्रकोट धबधबा भारताचा नायग्रा फॉल म्हणूम ओळखला जातो. या धबधब्याची रुंदी अंदाजे 300 मीटर आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.