Maharashtra's Reverse Waterfall: उलट्या दिशेने वाहणारा धबधबा! महाराष्ट्रातील भन्नाट ठिकाण आहे तरी कुठे? वाचा कसं जायचं

Reverse Waterfall in Maharashtra: धबधबा पाहून तुमच्या डोक्याला नक्कीच मुंग्या येतील. कारण सहसा धबधब्यावर वरून पाणी पडताना दिसते. मात्र जुन्नारमध्ये असा एक धबधबा आहे ज्यात थेट खालच्या दिशेने वरती पाणी जाताना दिसते.
Tourist Places Waterfalls
Waterfalls NewsSaam TV
Published On

महाराष्ट्रात अनेक विलक्षणीय आणि अद्भुत गोष्टी घडतात. यातील काही गोष्टी अगदी आपल्या डोळ्यांना विश्वास बसणार नाही अशाही असतात. सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाळा सुरू झालाय. पाऊस बरसताच पर्यटकांना धबधब्याखाली भिजण्याचे वेध लागतात.

Tourist Places Waterfalls
Mesmerising Waterfalls in India: पावसाळ्यात धबधब्यांवर जायचा प्लान करताय? मंत्रमुग्ध करणारे हे टॉप 5 धबधबे बघाच!

तुम्हाला देखील धबधब्याखाली मनसोक्त पावसाचा आनंद घ्यावा वाटत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट धबधबा शोधलाय. हा धबधबा पाहून तुमच्या डोक्याला नक्कीच मुंग्या येतील. कारण सहसा धबधब्यावर वरून पाणी पडताना दिसते. मात्र जुन्नारमध्ये असा एक धबधबा आहे ज्यात थेट खालच्या दिशेने वरती पाणी जाताना दिसते.

उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याचं नाव कोकणकडा धबधबा असं आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण आहे. जिथे गुरुत्वाकर्षणाचा नियम फेल ठरतोय. जुन्नर तालुक्यातील दुर्गवाडी कोकणकडा परिसरात असलेला हा धबधबा रिव्हर्स Waterfall म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यातील नानेघाटात तुम्हाला हा धबधबा वाहताना दिसेल.

कोकणकडा धबधब्याला अशी भेट द्या

या धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्हाला आधी जुन्नरला यावे लागेल. त्यासाठी तुम्ही खासगी वाहनाने येऊ शकता. किंवा मग बसने जुन्नर बस स्थानक गाठू शकता. त्यानंतर येथून खासगी वाहनाने तुम्ही नाने घाटातील कोकणकडा धबधब्याला भेट देऊ शकता.

कोकणकडा धबधब्याचं सौंदर्य अगदी मनमोहक आहे. येथे आल्यावर तासंतास हा धबधबा पाहतच रहावं असं वाटतं. तुम्ही देखील पावसाळ्यात ट्रिप प्लान करत असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या.

Tourist Places Waterfalls
Amboli Waterfall: आंबाेली घाट धबधबा परिसरात 13 पर्यटकांवर वनविभागाची कारवाई, 11 हजार 500 रुपयांचा दंड वसूल; जाणून घ्या नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com