Lalbaugcha Raja 2024: गणपती बाप्पा मोरया! लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याचे PHOTOS

Lalbaugcha Raja Padya Pujan Sohala 2024: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याने मुंबईतल्या गणेशोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरूवात होते.
Lalbaugcha Raja 2024: गणपती बाप्पा मोरया! लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न
Lalbaugcha Raja Padya Pujan Sohala 2024Saam Tv

पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर सण-उत्सवांच्या तयारीला सुरूवात होते. सर्वांना वेध लागतात ते म्हणजे गणेशोत्सवाचे. मुंबईकरांसह लाखो गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. लालबागच्या राज्याच्या पाद्य पूजनानेच मुंबईतल्या गणेशोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरूवात होते. मोठ्या उत्साहामध्ये आणि गणेशभक्तांच्या उपस्थितीमध्ये लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आज पहाटे ६ वाजता लालबागच्या राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन केले. लालबागच्या राजाच्या पाद्य पूजनानंतर मूर्तीकार लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरूवात करतात. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे ९१ वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवामध्ये मोठ्यासंख्येने भाविक गर्दी करत असतात.

Lalbaugcha Raja 2024: गणपती बाप्पा मोरया! लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न
Navi Mumbai Crime: संतापजनक! निर्दयी बापाने ५ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटलं; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

मंगळवारी सकाळी ६ वाजता लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि मूर्तीकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते पाद्यपूजन सोहळा पार पडला. मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत हा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे देखील पूजन केले. लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Lalbaugcha Raja 2024: गणपती बाप्पा मोरया! लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न
Mumbai Coastal Road: कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून प्रवाशांच्या सेवेत! EXCLUSIVE आढावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com