Navi Mumbai Crime: संतापजनक! निर्दयी बापाने ५ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटलं; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

Uran Crime News: आरोपी वडिलांनी स्वतःच्याच चिमुकल्या मुलीला उचललं आणि रागाच्या भरात तिला जमिनीवर जोरात फेकलं .त्यामुळे चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे.
Uran Crime News
Navi Mumbai CrimeSaam tv

प्रत्येक पती पत्नीमध्ये वाद होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. मात्र यातील अनेक वाद सहज मिटून जातात. तर काही वाद कधीकधी एकदम टोकाला जातात की अनेक भयानक प्रकार घडतात. अशीच एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना आता नवी मुंबईतील समोर आली आहे. यात आपल्या पत्नीसोबतच्या भांडणानंतर पतीने आपल्या बाळाचाच जीव घेतला आहे.

Uran Crime News
Shirpur Crime News : अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात प्राध्यापक गंभीर; शिरपूर तालुक्यातील घटना

सर्व धक्कादायक घटना नवी मुंबईतील उरण(uran) भागातील आहे. या घटनेने सर्वांना थक्क केले आहे. पत्नीशी वैयक्तिक कारणावरुन झालेल्या वादातून संतापलेल्या पित्याने आपल्याच महिन्यांच्या नवजात मुलीला जमिनीवर आपटलं ,त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिल खुशीराम वय २० आणि अमृता वय २० असे मृत बाळकाच्या आई-वडिलांचे नाव आहे. खुशीराम हा मजुरीचे काम करतो. या दोघांनीही काही वर्षांपूर्वी लग्न(Wedding) केले होते आणि त्यांना एक मुलगी होती. तसेच ते उरण भागात वास्तव्यास होते.

नक्की काय झाले ?

खुशीराम आणि अमृता यांच्यामध्ये काय कायम खुशीराम यांच्या दारुच्या सवयीमुळे दररोज वाद होत असतं. रविवारी ९ जून रोजी अमृता ही खुशीराम याच्यासोबत झालेल्या वादानंतर माहेरी निघून गेली. त्यानंतर खुशीराम तिला परत आणण्यासाठी तिच्या माहेरी पोहचला मात्र तिने परत येण्यास नकार दिला. मात्र खुशीरामने रागाच्या भरात आपल्या मुलीला परत घरी घेऊन जाण्याची मागणी करु लागला. अमृताने त्याचे नाही ऐकल्यास मुलीला नुकसान पोहचवण्याची धमकी त्याने दिली मात्र रागाच्या भरात जमिनीवर आपटले.

जमिनीवर आपटल्याने चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तात्काळ तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना सोमवार सकाळी चिमुकलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या बाबतचा अधिक तापस सुरु केला आहे.

Uran Crime News
Kalyan Crime News : फुटपाथवरून सहा महिन्याच्या चिमुरड्याचे अपहरण; बारा तासात पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com