Kalyan Crime News : फुटपाथवरून सहा महिन्याच्या चिमुरड्याचे अपहरण; बारा तासात पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

Kalyan News : नाशिक सिन्नर फाटा येथील झोपडपट्टीत राहणारी आयेशा हि कल्याणात भंगार गोळा करण्याचे काम करते हे भंगार विकून उदरनिर्वाह करायची
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास फुटपाथवर झोपली असताना तिच्या सहा महिन्याचे चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली होती. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून अवघ्या १४ तासात या चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या दोन जणांना बेड्या ठोकत सहा महिन्याच्या चिमुकल्याचे सुखरूप सुटका केली.

नाशिक सिन्नर फाटा येथील झोपडपट्टीत राहणारी आयेशा हि कल्याणात भंगार गोळा करण्याचे काम करते हे भंगार विकून उदरनिर्वाह करायची. आयेशाला अरबाज हा ६ महिन्याचा मुलगा आहे. दिवसभर काम करून रस्त्याच्या कडेला आसरा शोधून ती मुलासह रात्रीचा निवारा शोधायची. नेहमीप्रमाणे ती मुलांसह (Kalyan) कल्याण पश्चिमेकडील व्हर्णाल मेमोरियल मेथडिस्ट चर्चच्या शेजारी असलेल्या कल्याण डोंबिवली परिवहन डेपोच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर झोपली होती.

Kalyan News
Majalgaon Rain : पहिल्याच पावसात सरस्वती नदी दुथडी; बीडच्या माजलगाव परिसरात जोरदार पाऊस

गाढ झोपेत असल्याचा फायदा घेऊन उल्हासनगरमधील रिक्षा चालक दिनेश सरोज (वय ३५) याने आपला मित्र अंकित कुमार राजेंद्र कुमार प्रजापती यांच्या मदतीने अरबाज या सहा महिन्याच्या चिमुरड्याचे गोणीत भरून अपहरण केले. याप्रकरणी आयेशा हिने महात्मा फुले पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचे अपहरण (Crime News) झाल्याची तक्रार दिली. दरम्यान चिमुरड्याला उचलून नेट असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने या परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता दिनेशने या चिमुरड्याचे अपहरण केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांना हा रिक्षा चालक उल्हासनगरमधील असल्याचे कळताच पोलिसांनी दिनेश आणि अंकित कुमार या दोघांना अटक करत दिनेशच्या घरातून अपहृत बालकाची सुटका केली. 

Kalyan News
Marathwada Water Crisis : मराठवाड्यात टँकरची संख्या पोहोचली 2 हजाराच्या वर; पावसाळा सुरू झाला तरी भीषण पाणी टंचाई

दरम्यान दिनेशला चार मुले असून धाकटा मुलगा सहा महिन्याचा आहे. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा दिनेशची पत्नी आपल्या मुलांसह पळवलेल्या मुलाला देखील दूध पाजत होती. यामुळे दिनेशने या मुलाचे अपहरण विक्रीसाठी केले की आणखी काही उद्देश आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या चिमुरड्याचे अपहरण विक्री करण्यासाठी केले होते किंवा जादूटोण्याच्या उद्देशाने केले असावे असा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com