Monsoon Trip : कमी बजेटमध्ये पावसाळ्याची ट्रिप एन्जॉय करायचीये? मग 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Cheapest Monsoon Trip : उत्तराखंड राज्यात वसलेल्या या शांत आणि मनमोहक ठिकाणी जाण्यासाठी फारसा खर्च सुद्धा लागत नाही. लॅन्सडाउन हिलस्टेशन समुद्रकिनारपट्टीपासून जवळपास १०७६ किमी अंतरावर आहे.
Monsoon Trip
Monsoon TripSaam TV

भारतात विविध पर्यटनस्थळे आहेत. येथील निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक डोंगराळ भागांत भ्रमंती करतात. डोंगराळ प्रदेशात भ्रमंतीसाठी जातान १० हजारांचा खर्च सहज होतो. एवढा खर्च होत असल्याने काही पर्यटक प्लान करूनही फिरण्यासाठी जात नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये फिरण्यासाठीची उत्तम ठिकाणे सांगणार आहोत.

Monsoon Trip
Priya Bapat Solo Trip : डोंगरदऱ्या अन् हिरवीगार झाडी; प्रिया बापटची सोलो ट्रीप, पाहा PHOTO

लॅन्सडाउन

उत्तराखंडमधील लॅन्सडाउन या ठिकाणी अनेक पर्यटक आवर्जुन भेट देतात. येथील निसर्गाचं सौंदर्य खरोखर अद्भूत आहे. उत्तराखंड राज्यात वसलेल्या या शांत आणि मनमोहक ठिकाणी जाण्यासाठी फारसा खर्च सुद्धा लागत नाही. लॅन्सडाउन हिलस्टेशन समुद्रकिनारपट्टीपासून जवळपास १०७६ किमी अंतरावर आहे.

चिली हिल्स

हिलस्टेशनमधील चिली हिल्स येथेही तुम्ही भेट देऊ शकता. येथे जाण्यासाठीचं बजेट सुद्धा फार कमी आहे. येथे पोहचण्यासाठी अवघे ३ ते ५ हजार रुपये खर्च येतो. येथे आल्यावर तुम्ही फॅमिलीसह वन्यजीव अभयारण्य, काली का टिब्बा, गुरुद्वारा, सिद्ध बाबा मंदिर, चॅलचे क्रिकेट मैदान आणि चॅल पॅलेसला सुद्धा भेट देऊ शकता.

अल्मोरा

उत्तराखंड हे असं ठिकाण आहे जिथे अनेक कमी बजेटच्या हिल स्टेशन ट्रिपचा आनंद घेता येतो. त्यासाठी अल्मोरा हे ठिकाण सुद्धा फार सुंदर आहे. अल्मोरा येथे कुमाऊं पर्वतरांगा सुद्धा आहे. जागेश्वर मंदिर, नंदा देवी मंदिर, कासार देवी मंदिर आणि स्वामी विवेकानंद मंदिर अशा मंदिरांना भेट देता येईल.

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे देखील डोंगराळ भागात वसलेलं ठिकाण आहे. महाबळेश्वरला भेट दिल्यानंतर येथे देखील अनेक डोंगर दऱ्या आहेत. महाबळेश्वर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १, ३७२ मीटर उंचीवर आहे. उन्हाळा, पावळा आणि हिवाळा अशा सर्वच ऋतुंमध्ये तुम्ही येथे भेट देऊ शकता. महाबळेश्वर हे अतिशय थंड हवेचं ठिकाण आहे. पावसाळ्यात देखील येथील निसर्गाचं सौंदर्य बहरलेलं असतं.

Monsoon Trip
Priya Bapat Solo Trip : डोंगरदऱ्या अन् हिरवीगार झाडी; प्रिया बापटची सोलो ट्रीप, पाहा PHOTO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com