Mozzarella Cheese Saam TV
लाईफस्टाईल

Mozzarella Cheese Recipe: घरच्याघरी मोजरेला चीज बनवणे आहे एकदम सोप्पे; रेसिपी वाचा आणि झटपट बनवा

Ruchika Jadhav

लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींना देखील चीज फार आवडते. गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिक देखील चीजचे मोठे फॅन झाले आहेत. प्रत्येक पदार्थात, पिझ्झा, बर्गर, पास्ता यामध्ये चीज हवे असते. तुम्हाला देखील चीज आवडत असेल तर बाजारातून चीज विकत घेणे प्रत्येकाला परवडणारे नसते. त्यामुळे आम्ही आज घरीच चीज कसं बनवायचं याची रेसिपी आणली आहे.

घरीच चीज बनवणे फार सोप्प आहे. त्यासाठी फार जास्त साहित्य देखील लागत नाही. अगदी कमी साहित्य वापरून देखील तुम्ही लज्जतदार चीज बनवू शकता. चीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य.

फुल फॅट मिल्क

  • व्हिनेगर

  • पाणी

  • मीठ

कृती

सर्वात आधी फुल फॅट असलेलं दूध एका भांड्यात ओतून घ्या. त्यानंतर हे दूध पाणी मिक्स न करता गॅसवर तपवण्यासाठी ठेवा. आपल्याला दूध उकळी येईपर्यंत उकळायचे नाही. हाताने सहज स्पर्श करता येईल एवढ्या तापमानावर दूध गरम करा. त्यानंतर या कोमट दुधात व्हिनेगर मिक्स करा.

व्हिनेगर दुधामध्ये टाकल्यावर फक्त एकदा त्यात चमचा फिरवून घ्या. त्यावर काही वेळाने दूध फाटेल. फटलेलं दूध पाण्यावर तरंगताना दिसेल. हे दूध फटल्याबरोबर ते चामच्याच्या किंवा एका गाळणीच्या साहाय्याने बाहेर काढून घ्या. त्यानंतर दुधाचे हे फलेलं मिश्रण एका सूती कापडात टाकून घ्या.

सूती कापडात घेतल्यावर त्यातील सर्व अतिरिक्त पाणी काढून घ्या. त्यानंतर दुधाच्या भांड्यातून फाटलेलं दूध बाहेर काढल्यावर त्यात हे पाणी उरलेलं आहे त्यामध्ये मीठ मिक्स करा. यात तुम्हाला फक्त 2 चमचा मीठ मिक्स करायचे आहे. त्यानंतर सुरू कापडात असलेलं मिश्रण देखील या पाण्यात टाकून घ्या. ते पाण्यात तसेच 5 मिनिटे ठेवा.

पुढे 5 मिनिटांनी तुमचे चीज आर्धे तयार झाले आहे. हे चीज एका काचेच्या भांड्यात ठेवून फ्रजरमर्ध्ये ठेवा. किमान 5 तास तरी हे थंड होण्यासाठी तसेच ठेवून घ्या. त्यानंतर तयार झालं अस्सल शुद्ध आणि मस्त देसी चीज. हे चीज तुम्ही विविध पद्धतीने पदार्थांमध्ये वापरू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT