ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भिजवलेले बदाम, तूप, साखर, दूध, वेलची पावडर, केशर
बदामाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम अर्धा वाटी बदाम एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
त्यानंतर भजलेल्या बदामांची साल काढून मिक्सरमधून जाड बारीक पेस्ट तयार करून घ्या.
त्यानंतर एका कढईत दूध मंद आचेवर गरम होण्यासाठी ठेवा आणि दुधाला उकळी येऊन द्या.
दुधाला उकळी आल्यावर त्यात साखर टाकून वितळवून घ्या त्यामध्ये थोडी वेलची पावडर टाका.
त्यानंतर दुधामध्ये बारीक केलेली बदामाची पेस्ट टाकून चांगली मिक्स करून घ्या.
खीरीला उकळी आल्यानंतर त्यात तूप आणि केशर टाकून सर्व्हिग बाऊलमध्ये सर्व्ह करा.