Mosquito Repellent Safety google
लाईफस्टाईल

Mosquito Safety: डासांसाठी अगरबत्ती घेताय? त्या आधी ही माहिती वाचाच

Mosquito Control: डासांपासून बचावासाठी वापरली जाणारी मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्ती खरेदी करताना सीआयआर नंबर, अधिकृत मंजुरी, घटकांची माहिती आणि लेबल तपासणे अत्यावश्यक आहे. बनावट व बेकायदेशीर उत्पादनांपासून ग्राहकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

Sakshi Sunil Jadhav

भारतातील अनेक घरांमध्ये डासांचा त्रास वाढला की संरक्षणावर अधिक भर दिला जातो. मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्ती घर सुरक्षित ठेवण्यासाठी एक सोयीचे आणि परिचयाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण, अधिकृत आणि कायदेशीर उत्पादनांसह अनेक बेकायदेशीर आणि बनावट अगरबत्ती देखील बाजारपेठेत आल्या आहेत. यामुळे ग्राहकांसाठी योग्य प्रकारची अगरबत्ती निवडणं आता अत्यंत महत्त्वाचे आहे. माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी खालील सोपी चेकलिस्ट तुम्हाला मदत करेल:

१. सरकारकडून मिळालेली मंजूरी (सीआयआर क्रमांक) तपासा

मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्तीची गणना कीटकनाशक वर्गात केली जाते. त्यामुळे, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या सेंट्रल इन्सेक्टिसाइड्स बोर्ड अँड रजिस्ट्रेशन कमिटी (सीआयबीआरसी)कडून त्यांची मंजूरी मिळणे अनिवार्य असते. मंजूर झालेल्या उत्पादनांच्या पाकिटावर सीआयआर (सेंट्रल इन्‍सेक्टिसाइड रजिस्‍ट्रेशन) क्रमांक असतो. हा क्रमांक खात्री देतो की, संबंधित उत्पादनाची सुरक्षा आणि परिणामकारकतेसाठी कठोर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमध्ये उत्पादनाच्या त्वचा, डोळे आणि श्‍वसनसंस्थेवर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन समाविष्ट असते. गुडनाइट अगरबत्ती सारखे नामांकित ब्रँड्स हा सीआयआर क्रमांक त्यांच्या पाकिटावर स्पष्टपणे दाखवतात. वैध सीआयआर क्रमांक नसलेली उत्पादने नियामक प्राधिकरणांकडून तपासली गेलेली नाहीत असे मानले जाते आणि अशा उत्पादनांच्या बाबतीत ग्राहकांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी देता येत नाही.

२. ‘हर्बल' किंवा ‘नॅच्‍युरल' दाव्यांबाबत दिशाभूल होऊ नका

अनेक स्वस्त मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्ती ‘हर्बल' किंवा ‘नॅच्‍युरल' अशा शब्दांचा वापर करून विकल्या जातात. यामुळे ग्राहकांना ही उत्‍पादने अधिक सुरक्षित आणि अस्सल असल्‍याचे वाटते. पण, अशा मार्केटिंगच्या दाव्यांना सरकारी मंजूरीचा पर्याय समजू नका. बाजारपेठेत उत्पादनाची मांडणी कशीही केली असली, तरी कोणत्याही कीटकनाशक अगरबत्तीची सरकारी प्राधिकरणांकडे नोंदणी होणे अनिवार्य असते. ग्राहकांनी मार्केटिंगच्या भाषेवर विश्वास ठेवण्याऐवजी उत्पादनाच्या अधिकृत नोंदणी तपशीलांवर अधिक भर दिला पाहिजे.

३. उत्पादनात वापरले जाणारे घटक/केमिकल समजून घ्या

उत्पादनात कोणते सक्रिय घटक वापरले आहेत, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने काही अगरबत्त्यांवर छापे टाकले असता, त्यामध्ये बेकायदेशीर किंवा अनधिकृत घटकांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. उदाहरणार्थ, ‘कंफर्ट' सारख्या उत्पादनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त डायमेफ्लुथ्रिनचा वापर झाल्याचे दिसून आले, तसेच ‘स्लीपवेल'मध्ये मेपरफ्लुथ्रिन आढळले, जेथे या फॉरमॅटसाठी मंजूरी नव्हती. मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्तीमध्ये रिनोफ्लुथ्रिन सारख्‍या घटकांचा वापर असावा, ज्यांना अधिकृत मंजूरी आणि नोंदणी मिळाली आहे. ग्राहकांनी उत्पादनाच्या पॅकेजिंगवर दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासावी आणि मंजूर सक्रिय घटकांचा स्पष्ट उल्लेख नसलेली उत्पादने खरेदी करणे टाळावे.

४. अत्‍यंत स्‍वस्‍त दरात उपलब्‍ध असलेल्‍या उत्पादनांबाबत सावध राहा

परवडणाऱ्या किमतीत वस्तू मिळणे महत्त्वाचे असले, तरी असामान्यपणे कमी किंमत म्‍हणजे त्या उत्पादनासंदर्भात नियमांचे पालन न करण्याचे लक्षण असू शकते. अनेकदा स्थानिक बाजारपेठेत अवैध मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्त्या अतिशय स्वस्त किमतीत विकल्या जातात. सरकारी नियमांच्या चौकटीबाहेर तयार केली जाणारी उत्‍पादने सरकारद्वारे ठरवून दिलेल्या सुरक्षा मानकांची पूर्तता करत नाहीत. म्‍हणून उत्‍पादन खरेदी करताना फक्त किमतीकडे न पाहता सरकारी मंजूरी असल्‍याची देखील तपासणी करावी.

५. लेबलवरील माहितीची पारदर्शकता तपासा

कायदेशीर नियमांचे पालन करणाऱ्या उत्पादनांच्या पाकिटावर उत्पादकाचे नाव, सक्रिय घटक, नोंदणी क्रमांक आणि वापरण्याबाबत सूचना ही माहिती स्पष्टपणे दिलेली असते. लेबलवरील ही पारदर्शकता म्‍हणजे उत्पादन सरकारी नियमांचे पालन करत असल्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. ही माहिती नसलेली उत्पादने शोधणे कठीण असते आणि त्यांना कोणतीही सरकारी मंजूरी नसण्‍याची शक्यता असते.

भारतामध्ये डासांमुळे होणारे आजार आजही मोठे आव्हान आहेत. अशा वेळी डासांपासून संरक्षणासाठी योग्य उत्पादनाची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारी मंजूरी आणि प्रमाणित घटकांची साधी तपासणी करून आपण आपल्या घरामध्ये फक्त शासनाने मान्यता दिलेल्या मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्तीचा वापर होत असल्याची खात्री करू शकतो. बेकायदेशीर किंवा अनधिकृत अगरबत्तीवर आपला पैसा वाया घालवू नका. खरेदी करण्यापूर्वी सावध राहा आणि घरामध्‍ये मॉस्किटो रिपेलेंट अगरबत्ती वापरताना काळजी घ्या. माहितीपूर्ण निर्णय प्रभावी आणि कायदेशीर संरक्षणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. ही संपूर्ण माहिती होम इन्‍सेक्‍ट कंट्रोल असोसिएशन (एचआयसीए)चे मानद सचिव जयंत देशपांडे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदावरून शिवसेना आक्रमक,तडजोडीला नकार – अरविंद मोरे

Vastu Shastra : घरात झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तूशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

SCROLL FOR NEXT