Alisha Khedekar
अळू सोलल्यानंतर हाताला खाज येत असल्यास लगेच लिंबाचा रस लावा. त्यामुळे खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
अळू सोलण्यापूर्वी हातावर खोबरेल किंवा शेंगदाणा तेल लावा. त्वचेवर संरक्षणाचा थर तयार होतो.
हाताला खाज सुरू झाल्यास थंड ताकाने हात धुवा. त्वचेला थंडावा मिळून अस्वस्थता कमी होते.
भाजीत चिंच, कोकम किंवा आंबट घटक घातल्याने अळूची खाज कमी होण्यास मदत होते.
अळू सोलताना हात डोळे, नाक किंवा चेहऱ्यावर लावू नका. त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो.
घरगुती उपाय करूनही खाज, सूज किंवा पुरळ वाढत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.