वंदे मातरमचा अपमान केला तर आता थेट जेल; संसदेत विधेयक मंजूर; कायद्यात तरतुदी काय आहेत? जाणून घ्या...

Punishment For Insulting Vande Mataram In India: संसदेत वंदे मातरम् विधेयक मंजूर; अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंत जेल आणि दंडाची तरतूद. कायद्यातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या.
VANDE MATARAM BILL PASSED IN PARLIAMENT: JAIL UP TO 3 YEARS FOR DISRESPECT
VANDE MATARAM BILL PASSED IN PARLIAMENT: JAIL UP TO 3 YEARS FOR DISRESPECTSaam tv
Published On

विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या जोरदार गोंधळानंतर अखेर संसदेत वंदे मातरम हे विधेयक मंजूर झाले आहे. बुधवारी 29 जुलै रोजी राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आज गुरुवारी 30 जुलैला लोकसभेत देखील हे विधेयक पास करण्यात आले. दोन्ही सभागृहांची मंजूरी मिळाल्यानंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवण्यात येणार आहे.

वंदे मातरमचा अपमान केल्यास किती शिक्षा होणार?

हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर राष्ट्रगीत वंदे मातरमला देखील राष्ट्रगीता प्रमाणे कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. नव्या कायद्याअंतर्गत वंदे मातरमचा अपमान करणे हा गुन्हा ठरणार आहे. वंदे मातरम गात असताना अडथळा आणणे किंवा कोणाला ते गाण्यापासून रोखणे हा देखील गुन्हा मनाला जाणार आहे. अशा प्रकारच्या कृत्यासाठी तीन वर्षांपर्यंत जेल आणि दंड होऊ शकतो. राष्ट्रगीताचा अपमान केल्यास जशी शिक्षा आहे, तशीच शिक्षा या प्रकरणात लागू केली जाणार आहे.

VANDE MATARAM BILL PASSED IN PARLIAMENT: JAIL UP TO 3 YEARS FOR DISRESPECT
Monsoon Session Bill: मोठी बातमी ! वंदे मातरम्’चा अपमान केल्यास होणार तुरुंगवास; सरकार आणणार कठोर कायदा

राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल आणि त्यानुसार राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चा सन्मान राखणे कायद्याच्या चौकटीत येईल. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी 24 जुलै रोजी राज्यसभेत हे विधेयक सादर केले होते. सरकारच्या मते, राष्ट्रीय गीताच्या गौरव आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत या गीताची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

VANDE MATARAM BILL PASSED IN PARLIAMENT: JAIL UP TO 3 YEARS FOR DISRESPECT
तुम्ही लपून राहू शकत नाही, एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर आणू; मल्लिकार्जुन खरगेंचा PM मोदी-अमित शाहांना इशारा

या विधेयकात राष्ट्रगीताच्या सर्व सहा कडव्यांचे गायन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने यापूर्वी राज्यांना दिलेल्या निर्देशांनुसार, ज्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगान वाजवले जाते, त्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीतही वाजवणे किंवा गायन करणे आवश्यक राहील. लोकसभेत ‘वंदे मातरम्’ विधेयक मंजूर झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज शुक्रवार, 31 जुलै रोजी सकाळपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com