Family Found Dead In Delhi: मच्छर अगरबत्ती लावून झोपी गेलं अख्खं कुटुंब, सकाळी ६ जण मृतावस्थेत आढळले; दिल्लीतील घटनेने हळहळ

Delhi News Update: दिल्लीत हृदयद्रावक घटना घडली आहे. मच्छर पळवून लावणाऱ्या क्वाइलच्या धुराने गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांना मृत्यू झाला.
Delhi 6 people in family found dead in house in Shastri Park area
Delhi 6 people in family found dead in house in Shastri Park areaSAAM TV
Published On

Delhi News: दिल्लीत हृदयद्रावक घटना घडली आहे. मच्छर पळवून लावणाऱ्या क्वाइलच्या धुराने गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांना मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात ही दुर्घटना घडली आहे.

मच्छर पळवून लावणारे क्वाइल पेटवून कुटुंब झोपी गेले होते. रात्री ती पेटवलेली क्वाइल एका गादीवर पडली. त्यामुळे अख्ख्या खोलीत धूर झाला. या धुरामुळे गुदमरून झोपी गेलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. तर घरातील दोन सदस्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  (Latest Marathi News)

Delhi 6 people in family found dead in house in Shastri Park area
Pune Sextortion News: धक्कादायक! पुण्यात 64 वर्षांचे आजोबा सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; ४ लाखाला घातला गंडा, video कॉल केला अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साधारण ९ वाजताच्या सुमारास शास्त्री पार्क पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्षात फोन आला होता. शास्त्री पार्क परिसरात एका घरात आग लागली आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून, या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Delhi 6 people in family found dead in house in Shastri Park area
Hingoli Crime News: धक्कादायक! लग्न करण्यास नकार दिल्याने वाद; तृतीयपंथीयाने तरुणाला संपवले

पोलिसांनी तपास केल्यानंतर प्राथमिक अंदाजानुसार, मच्छर पळवून लावणारे क्वाइल घरात पेटवले होते. रात्री ते एका गादीवर पडले. त्यामुळे आग लागली. त्यामुळे धूर पसरला. या धुरामुळे श्वास कोंडून घरात झोपी गेलेले सर्व जण बेशुद्ध पडले. गुदमरून सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास सुरू आहे.

दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पोलिसांनी सांगितले की, या घटनेत गुदमरून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एक दीड वर्षाचा मुलगा आहे. तर दोघे गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यात एक १५ वर्षीय मुलगी आणि एका ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय एका २२ वर्षाच्या तरुणावर प्राथमिक उपचार करून त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com