Monsoon Health Tips Saam TV
लाईफस्टाईल

Monsoon Tips : सावधान ! पावसात साचलेल्या पाण्यातून जाताय? 'या' गंभीर आजाराचा धोका, वाचा सविस्तर

Monsoon Health Tips : पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यावर आपल्याला दूषित पाण्यातून चालावे लागते, यामुळे अनेक जंतू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात. याच जंतूंमुळे तुम्हाला नेमका कोणता आजार होऊ शकतो वाचा.

Aarti Ingle

पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. मात्र याच पाण्यातून चालल्याने तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो.

पावसाळा असा एकमेव ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो. पण याच पावसामुळे अनेक आजारांचा धोकाही वाढतो. मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अशातच जोरदार पाऊस म्हटले की अनेक ठिकाणी पाणी साचणे, पूर येणे अशी परिस्थिती ओढावते. या साचलेल्या पाण्यामुळे अनेक गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यावर आपल्याला दूषित पाण्यातून चालावे लागते, यामुळे अनेक जंतू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात. याच जंतूंमुळे तुम्हाला नेमका कोणता आजार होऊ शकतो वाचा.

१) पावसाळ्यात होणारा गंभीर आजार

लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणूंचा संसर्गजन्य आजार आहे. पावसाळ्यात हा गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतो. पावसात साचलेल्या पाण्यात जेव्हा आपण चालतो तेव्हा त्यातील विषाणू आपल्या पायाला चिकटतात. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिस हा आजार होतो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात उंदाराने लघवी केल्यास त्याचे जिवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. प्राण्यांनी साचलेल्या पाण्यात लघवी केल्यास त्यात अनेक सूक्ष्मजंतू असतात. आणि जेव्हा एखादी व्यक्ती या पाण्यातून चालते तेव्हा ते सूक्ष्मजंतू शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर हा जंतू रक्तप्रवाहात शिरतो आणि संपूर्ण शरीरात पसरतो. शरीरावरील एखाद्या खुल्या जखमेतून हा आजार शरीरात प्रवेश करतो.

२) लेप्टोस्पायरोसिस आजाराची लक्षणे

- सामान्य लक्षणे - उच्च ताप, मळमळ आणि उलटी, घसा खवखवणे,भूक न लागणे, पोटदुखी, डोळ्यांमध्ये लालसरपणा, स्नायू दुखणे, थरथरणे

- गंभीर लक्षणे - अत्यंत थकवा, श्रवणशक्ती कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होतो, कावीळ, धाप लागणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तस्त्राव होणे तसेच लघवी कमी होणे.

३) 'लेप्टोस्पायरोसिस'ला रोखण्यासाठी काय करावे?

- साचलेल्या पाण्यामध्ये जाणे टाळावे. अन्यथा साचलेल्या पाण्यातून जाताना पूर्ण कपडे घालावेत किंवा बंद शूज, इत्यादींचा वापर करावा. 

- सांडपाणी किंवा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्यास वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर अँटिबायोटिक्स प्रोफिलॅक्सिस घ्या.

- पावसाळ्यात पादत्राणे न घालता बाहेर जाणे किंवा चालणे टाळावे.

- लेप्टोस्पायरोसिस पूर्णपणे बरा होतो. रुग्णाला अँटिबायोटिक्स देऊन लेप्टोस्पायरोसिस बरा केला जाऊ शकतो. मात्र रुग्ण अधिक गंभीर झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Treatment: गूड न्यूज! कॅन्सर कायमचा नष्ट होणार; तज्ज्ञांना मिळालं सोल्युशन

Maharashtra Live News Update: राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

Crime News : दुचाकीवरून घेऊन गेला, वाटेत कॅनॉलमध्ये बुडवून मारलं; जन्मदात्या बापाने घेतला ७ वर्षाच्या मुलीचा जीव

Sunetra Pawar Oath Ceremony : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहणार? शरद पवारांचं मोठं विधान

Baramati Name History: 'बारामती' हे नाव कसं पडलं? खरा इतिहास काय आहे?

SCROLL FOR NEXT