ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरू होताच सर्वत्र परिसर हिरवगार होतं. मात्र, पावसाळा सुरु होताच अनेक आजारांना आमंत्रण देतो.
आजकाल हावामानात खूप बदल होत आहेत कधी ऊन तर कधी पाऊस. अशा वातावरणात स्वत:ला हायद्रेट ठेवा.
या बदलत्या हवामानामुळे आणि पावसाळ्यत काविळ, चिकगुनिया, मलेरिया, डेंग्यू अश्या साथीच्या आजारांचा धोका वाढतो.
साथीचे आजार डासांमुळे होतात. पावसाळ्यात जास अंडी घालतात आणि त्यामुळे अनेक आजार पसरतात.
पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता असते त्यामुळे टायफॉअड आणि कॉलॅराचा धोका वाढतो. त्यामुळी पावसाळ्यात उकळून किंवा फिल्टरमधलं पाणी प्या.
बागेत पाण्याचा साठा होऊन देऊ नका यामुळे डासाची संख्या वाढते आणि तुमच्या घरात शिरू शकतात.
संध्याकाळ होताच घराच्या खिडक्या दरवाजे बंद करा. त्यासोबतच घरात खेळती हवा ठोवण्याचा प्रयत्न करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.