ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताच वातावरणामध्ये गारवा आणि आद्रता निर्माण होते.
पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्गाचे आजार होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात दूषित पाणी, अन्नपदार्थ इत्यादी गोष्टींचे सेवन केल्याने आरोग्य खराब होऊ शकत.
पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करणे टाळा.
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू नये. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया, बुरशी आणि अनेक कीटक आढळतात.
पावसाळ्यात मशरूमचे सेवन करू नये. वारावरणातील आद्रतेमुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढतात.
पावसाळ्यात दही खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे असे आजार होण्याची शक्यता असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.