Shreya Maskar
अनेकांना पीयूष खूप आवडतो. कारण पीयूष प्यायल्यावर मूड फ्रेश होतो.
पावसात बाहेरच्या गोष्टी खाणे टाळावे आणि घरीच पदार्थ बनवा.
पीयूष बनवायला जरी सोपा असला. तरी तो तयार करताना विशेष काळजी घ्यावी.
घरी गोड, स्वादिष्ट पीयूष बनवायचा असल्यास दही, साखर, वेलची पावडर, जायफळ पावडर, केशर, मीठ, पिवळा रंग, ड्रायफूट्स इत्यादी साहित्य लागते.
पीयूष बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात सुती कापड ठेवून त्यात दही ओतून अर्धा तास टांगून ठेवा.
मग हे दही दुसऱ्या भांड्यात काढून यामध्ये साखर, वेलची पावडर, जायफळ पावडर, केशर, मीठ, पिवळा रंग हे पदार्थ घालून सर्व मिक्स करून घ्या.
या मिश्रणातील साखर विरघळेपर्यंत रवीने ढवळत रहा.
आता पीयूष सर्व्ह करताना ग्लासमध्ये ओतून वरून ड्रायफूट्सने सजवा.
पीयूष दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी हवा बंद बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.