Monsoon Health Tips Saam tv
लाईफस्टाईल

Monsoon Health Tips : आला आला पावसाळा, तब्येत जरा सांभाळा ! मुलांना इनफेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या

कोमल दामुद्रे

Monsoon Care : पावसाळा हा ऋतू जितका सुखद तितकाच आरोग्यासाठी घातक समजला जातो. पावसाळ्यात आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वातावरणात तयार होणाऱ्या गारव्यामुळे आपल्या शरीरावर लगेच परिणाम होतो.

या ऋतूमध्ये आपल्याला ताप, सर्दी, खोकला, त्वचारोगस, डायरिया व मलेरियासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. अशावेळी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते. ज्यामुळे संक्रमण लवकर होते. परंतु, काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही मुलांना इनफेक्शनपासून वाचवू शकतात. जाणून घेऊया कसे ते

1. सतत हात धुवा

या ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी, विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करणे सर्वात महत्वाचे आहे काही खाण्यापूर्वी मुलांचे (Child) हात स्वच्छ धुणे. यासाठी किमान 20 सेकंद साबण आणि पाण्याने हात धुवा. विशेषत: शौचालय वापरल्यानंतर, खाण्यापूर्वी आणि आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर हात स्वच्छ (Clean) करा.

2. आजारी लोकांशी संपर्क टाळा

तुमच्या आजूबाजूला कोणी आजारी असेल, सर्दी किंवा फ्लूची लक्षणे (Symptoms) दिसत असतील तर त्या व्यक्तीपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर स्वत:ची विशेष काळजी घ्या

3. लसीकरण करा

पावसाळ्यात फ्लू आणि न्यूमोनिया यांसारख्या विषाणूजन्य संसर्गाविरूद्ध लसीकरण केले जाऊ शकते. लसीकरण केल्याने मुलांना होणारा संसर्ग टाळण्यास मदत होऊ शकते.

4. आरोग्याला पोषक अन्न खा

संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुमची प्रतिकारशक्ती (immunity) मजबूत करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घ्या. निरोगी अन्न खाल्ल्याने शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे या वेळी भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा.

5. हायड्रेटेड राहा

निरोगी राहण्यासाठी हायड्रेटेड राहणे देखील खूप महत्वाचे आहे. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा वातावरण उष्ण आणि दमट असते. अशा परिस्थितीत हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर द्रवपदार्थ जसे पाणी, ज्यूस इत्यादी प्यावे.

6. घराभोवती पाणी साचू देऊ नका

घराबाहेर पावसाचे (Monsoon) पाणी साचल्यास ते वेळीच कोरडे करा. यामुळे डास तयार होतात. अशा पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाचे डास वाढू शकतात. अशा वेळी पावसाळ्यात घरामध्ये किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका याची काळजी घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

SCROLL FOR NEXT