
Nose Choke Up : पावसाळा सुरु झाला की, अनेक आजारांच्या समस्या तोंड वर काढतात. वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकल्याची समस्या अधिक प्रमाणात होते. पावसाळा म्हटलं की, अनेक आजारांना निमंत्रण मिळते. वातावरणातील बदलामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.
पावसाळ्यात नाक गळणे, नाक बंद होणे, अंग दुखणे यांसारखे आजार होतात. अशावेळी काहीही केल तरी सर्दी कमी होत नाही. त्यामुळे झोप व्यवस्थित होते नाही व आरोग्याचे गणित बिघडते. डोकेदुखी व नाक बंद झाल्यामुळे चेहऱ्यावर ताण येतो. अशावेळी काय करावे हे सुचत नाही.
पावसाळ्यात नाक बंद होण्याच्या समस्येपासून आराम कसा मिळवायचा?
1. ओवा
आपल्या स्वयंपाकघरात (Kitchen) असणारा ओवा हा सर्दी खोकल्यावर फायदेशीर ठरु शकतो. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे नाक बंद झाल्यास याचा वापर करता येतो. ओव्यामध्ये थायमॉलसारखे आवश्यक घटक असतो. याचा वापर केल्यास श्वास घेण्याच्या (Breathing Problem) समस्येपासून सुटका होऊ शकते.
2. निलगिरी तेल
नाक गळतीच्या समस्येवर रामबाण ठरते ते निलगिरी तेल. गरम पाण्यात निलगिरी तेल टाकून त्याची वाफ घेतल्यास आराम मिळू शकतो. निलगिरीमध्ये असणारे घटक श्लेष्मा तोडण्यास मदत करतात. याशिवाय खोकला, श्वास घेणे, सायनस ग्रंथींमधील सूज कमी करण्यात मदत होते.
3. आले आणि पुदीना
आले (Ginger) आणि पुदिना त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. नाक बंद होणे यापासून आराम देण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. आल्यामध्ये जिंजेरॉल नावाचे संयुग असते, ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, तर पुदिन्याचा प्रभाव थंड असतो. याचा चहा बनवून प्यायल्याने आराम मिळू शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.